कट्टा न्यूज नेटवर्क
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यां आतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शनिवारी अतीशी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. त्यांना दिल्लीच्या (Delhi) तिसऱ्या महिला व सर्वात तरुण मुख्यमंत्री (chief minister)होण्याचा मान मिळाला. त्याआधी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित, भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी हे पद भूषविले होते.
आतिशी यांच्या मंत्रिमंडळातील सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसैन, मुकेश अहलावत यांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.दिल्लीतील राज निवासमध्ये आतिशी यांचा मुख्यमंत्री पदासाठी शपथविधी झाला. त्याला आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया व आपचे अन्य नेते व आमदार, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल, विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता आदी उपस्थित होते