धाड येथील शाळाबंद आंदोलनास यश..!! दोन दिवसात हटविण्यात येणार अतिक्रमण,बांधकाम विभागाने बुलढाणा पंचायत समितीला दिले पत्र

 

सलमान नसीम अत्तार/चांडोळ प्रतिनिधी 

 

जो पर्यंत धाड येथील जि.प.उर्दू शाळेच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण हटविण्यात येत नाही तसेच मिर्झा गल्ली ते जामठी रोडवर पुल होत नाही. तो पर्यंत शाळेत धाड येथील उर्दू शाळेत एक ही विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशा प्रकारची आक्रमक पवित्रा धाड (dhad) येथील शाळा समिती सदस्य,पालक व गावकऱ्यांनी गेल्या सात दिवसापासुन घेतली होती. शाळा बंदची मागणी बुलढाणा (buldhana) पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाकडे दि.१० सप्टेंबरला केली होती.

 

 

धाड येथील पालक व गावकऱ्यांनी संबंधित निवेदनाद्वारे गटविकास अधिकारी तसेच बांधकाम विभागाकडे अशी मागणी केली आहे की उर्दू शाळेतील (school news) रस्ताच्या दोन्ही बाजुला काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याच कारणामुळे रस्ता कमी होत चालले आहे. ह्यामुळेच रस्तावर अपघात होत आहे. मंगळवारी इयत्ता दुसऱ्या वर्गाची विद्यार्थीनी कु.माहेरा इरम मो.अल्ताफ हया विद्यार्थीनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. एखादया वेळी मोठा अपघात होऊन जीवीतहानी ही होऊ शकते. धाड येथुन जवळपास पंधराशे विद्यार्थी उर्दू शाळेत ये-जा करतात.

 

 

तसेच विद्यार्थींनां एकाच पुलावरुन येणेजाणे करावे लागते हयाच पुलावरुन रेतीचे टिप्पर, बस,दुचाकी वाहनांची मोठया प्रमाणावर वर्दळ असते विद्यार्थीनसह नागरीकांना जीवमुठीत घेऊन यावे जावे लागते त्यासाठी मिर्झा नगर ते जामठी रोडवर एका नविन पुल तयार करण्यात यावे जणे करुन विद्यार्थ्यानसाठी सोयीचे होईल. हा विषय वेळोवळी आपल्याकडे तसेच जि.प.बांधकाम विभागाकडे सातत्याने मागणी केली शेवटी शाळा समिती, पालक व गावकऱ्यांनी पंचायत समिती बुलढाणा हया ठिकाणी आंदोलन सोमवार दि.१७ सप्टेंबरला ठिया आंदोलन मांडण्यात आले .

 

 

हया ठिया आंदोलनाला शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, धाडचे मा.सरपंच रिजवान सौदागर यांनी पाठींबा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यावरुन गटविकास अधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रकाद्वारे माहिती दिली की धाड ते जामठी रोडवर जिल्हा परिषद उर्दू उ.प्रा.शाळेजवळ रस्त्याच्या हद्दीतील अतिक्रमण काढुन तसेच रस्तावर स्पिड ब्रेकर टाकण्याबाबत पत्र क्र 3227/2024दि.12/09/2024 नुसार असा पत्र चिखली बांधकाम विभागाने बुलढाणा पंचायत समितीला देण्यात आला आहे.