Washim : रिठद येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या तणावातून आत्महत्या.

 

नारायणराव आरु पाटील/वाशीम जिल्हा प्रतिनिधी

 

वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची कर्जाच्या तणावातून आत्महत्या.शेतकरी बबन श्रीराम जाधव वय वर्ष ४३ यांनी त्यांचे राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.यांचेकडे शेती एक एकर यामध्ये सोयाबीन असून यावर्षी सोयाबीनला पाहिजे त्या प्रमाणात शेंगा धरल्या नसून जास्त पावसामुळे केवळ पिकाची वाढ झाली त्यामुळे एका एकरावर असलेले ३१ हजार रुपये बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रिठद चे कर्ज हे फेडले जाणार नाही असे नेहमी-नेहमी त्यांचे मनाला वाटत होते.

 

 

आणि शेती अत्यल्पभूधारक असल्याने इतर कमावण्याचे कोणते साधन नाही. मोलमजुरी करण्यासाठी कुणाच्या तरी वाहनावर रोजाने वाहन चालवत असे त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात घर चालवण्यासाठी पैसे नव्हते त्यामुळे दोन दिवसापासून आत्महत्या करणार असे त्याच्या मनाशी वाटत होते. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही दशा झाल्याचे घरातील महिला,व भाऊ बोलत होता व बाहेर गावातील लोकांमध्ये चर्चा सुद्धा होती की यावर्षी शेतीमध्ये नुकसान होत आहे.

 

 

उत्पन्नात घट येणार आहे. अशा चर्चेमुळे बबन श्रीराम जाधव यांनी दि.१९/९/२०२४ ला सायं.जवळपास ६.००वा.दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.याचे मागे पत्नी सौ.कमल वय ३७, मुले दोन आहेत. वय १६ व ११ वर्षाचे आहेत .या बाबत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला फोन करण्यात आला त्यामुळे वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे बिट जमादार व त्यांचे सहकारी यांनी स्थानिक जागेवर येऊन पंचनामा केला. आणि शव विच्छेदनासाठी वाशिम येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आली.