
वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरु पाटील
वाशीम (washim) तालुक्यातील आडोळी या गावालगतच्या शेतशिवारात वन्य प्राण्यांनाचा हैदोस सुरू झाला असून शेतकऱ्यांच्या पेरलेल्या पिकांचे नुकसान करीत आहे, अडोळी येथील गंगुबाई इढोळे यांच्या ४०१ गटातील जमिनीमध्ये हरभऱ्याचे पिक रानडूकरांनी ऊगविण्या आधिच खाऊन फस्त केले आहे ,सदर नूकसान ग्रस्त शेतीची वन विभागाचे अधिकारी कोण पाणी व्हावी व शासनाकडून आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राचा पंचनामा करून ७२ तासात करायलाच पाहिजे, याकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे. अशी मागणी शेतकरी गंगुबाई इढोळे यांनी बोलतांना केली आहे.