नारायणराव आरु पाटील प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते गोपाल भिसडे लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, त्याला विभूतीपूजा आवडत नाही. विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे,पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हारकत नाही. तथापि, तेवढ्यानेच त्या पुढाऱ्याचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱ्याची देवाप्रमाणे पूजा करणे गोपाल यास बिल्कुल मान्य नाही.
त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अधःपात होतो.असे बोलतांना सांगितले.वाढदिवसाच्या दिनी गोपाल भिसडे मित्रपरीवारास सोभत वाढदिवस केक न कापता साजरा केला .हे सुद्धा कृती च्या माध्यमातून करून दाखविले. सामाजिक कार्यकर्ता म्हणून गोपाल भिसडे यांनी त्यांचा वाढदिवस कोणताही केक न कापता, असला प्रकार टाळून आजचा दिवस रक्तदान शिबीर घेऊन घालवला आहे,
आपला वेळ सत्कारणी लावावा असे गोपाल भिसडे वाढदिवसाच्या निमित्ताने बोलतांना म्हणाले युवा शिवव्याख्याते गोपाल भिसडे यांनी यावर्षी कुठलाही वायफळ खर्च न करता गरजूंना भोजनदान देऊन आणि रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवसाच्या दिनी एक वृक्ष लावून ते जतन करण्याचा संकल्प करून वाढदिवस साजरा केला..