“रात्रीस खेळ चाले” तो नाही आला तरीही निघून जाते,तो येतो तरीही ती घरातून निघून जाते, त्यामुळे घरातील लोक तिच्यामुळे परेशान”.

 

 

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

रिठद विद्युत उपकेंद्रावरील  “रात्रीस खेळ चाले, या उक्तीप्रमाणे लाईट जाण्याच्या प्रकरणाला आळा बसला पाहिजेत.” तो आला नाही तरीही ती निघून जाते, तो येतो तरी पण ती निघून जाते, अशा नेहमी -नेहमी जाण्यामुळे घरातील पुरुष , महीला, लहान मुले फार वैतागून गेले. तिचं दोन दिवस झाले कुणालाही समजेनासे झाले काय होतंय, कुणीही कुणाला सांगितलं तरी काय झालं असेल समजत नाही.पण ती काही समजून घ्यायला तयार नाही.

 

 

 

अशा प्रकारामुळे घरातील मंडळी व जनता कंटाळली, मग तक्रार मांडायची कुणाकडे अशा पडणाऱ्या प्रश्नाला प्रत्येक घरातील व्यक्ती कंटाळला असून ती काही थांबायचं नाव घेईन, अशा प्रकारामुळे पाण्याचा एक थेंब पडला की लाईट जाते. आकाशात ढगाची गर्दी जमली की लाईट निघून जाते. या प्रकारचा फा‌ॅल्ट कोठे आहे.हे न उलगडणारे कोडे कधी सुटेल दररोजच्या दिवसा व उशीरा रात्री पर्यंत घरातील लाईट जाण्यामुळे प्रत्येक घरातील व्यक्ती फार वैतागला असून या गोष्टीचा कुठेतरी बंदोबस्त व्हायला पाहिजे.

 

 

 

स्थानिक लोक याबाबत वारंवार विचारणा करतात तो येत नाही तरीही ती निघून जाते आणि तो येतो तरी निघून जाते. अशी कारणाने ग्राहक त्रस्त झाले.हा प्रकार दि.५ सष्टे.व ६ सष्टे २०२४ रोजी चालूच होता.या फा‌ॅल्ट समजत नसल्याने असे प्रकार ते दुरुस्ती न झाल्याने विद्युत सूरु होत नसेल ते योग्य नाही. कारण या अगोदरही प्रत्येक वेळचा खेळ झालेला आहे त्यामुळे जनतेचा मेळ मात्र कुठे बसत नाही असंच दिसते त्यामुळे जनतेला दिवसा व रात्री अंधारात राहावे लागते या बाबीची कारण मीमांणसा करून जनतेला न्याय मिळेल

 

 

 

व प्रत्येक गावातील व्यक्तीला लाईटची सेवा मिळेल या पद्धतीने नियोजन करून एकदा काय तो न्याय निवडा करावा व जनतेच्या दरबारातच हा निर्णय व्हावा यासाठी उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता विद्युत वितरण कंपनी वाशिम यांनी हा होत असलेला नेहमीचा प्रकार चांगला टेक्निकल व्यक्ती रिठद विद्युत उपकेंद्र येथे पाठऊन समस्या दूर करावी अशा त्रासाला ग्राहक भाग वैतागले आहेत.*”दिवसा रात्रीस खेळ चाले हे नाटक कायम बंद झाले पाहिजेत.”*अशी ग्राहकांची अपेक्षा