बदलापूर घटनेसंदर्भात कारंजा येथे स्वाक्षरी मोहीम -प्रिया महाजन.

 

 

नारायणराव आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी

 

बदलापूर घटनेसंदर्भात कारंजा येथे दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हाप्रमुख-प्रिया ताई महाजन युवतीसेना वाशीम , पश्चिम विदर्भ युवती विभागीय सचिव अकोला, वाशीम, बुलढाणा यांच्या नेतृत्वात कारंजा तालुका जि. वाशिम येथे शक्ती कायदा तसेच बदलापूर येथील चिमुकल्या भगिनींवर झालेल्या लैगिक अत्याचाराला वाच्या फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )

 

 

यांच्या वतीने भव्य स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली असता, विद्यालयातील विध्यार्थीनी सोबत संवाद साधत चर्चा केली, तेंव्हा काही विध्यार्थीनी यांनी महिला अत्याचाराच्या विरोधात रोष व्यक्त करीत, ताई!आम्ही तुमच्या सोबत आहोत, आणी जवळपास 200 विद्यार्थ्यांनी वा महिलांनी मुस्लिम महिलांनी सुद्धा यात सहभाग घेऊन, उपस्थिती दर्शविली….