KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

साखरखेर्डा परिसरात केबल चोरट्यांचा धुमाकूळ! शिंदीतील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून केबल लंपास

On: November 26, 2026 11:35 AM
Follow Us:
साखरखेर्डा परिसरातील शिंदी येथे शेतातील केबल चोरी

साखरखेर्डा | समाधान सरकटे 

KattaNews जाहिरात 1

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेतातील साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रताळी, मोहाडी, साखरखेर्डा, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, गुंज आणि सावंगी भगत परिसरातील शेतांमध्ये यापूर्वी सोलार पॅनलच्या केबलची चोरी आणि पॅनलची नासधूस झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. आता शिंदी येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबरच्या रात्री घडली आहे.

KattaNews जाहिरात 2

शिंदी येथील अनिल आत्माराम खरात आणि सोपान नारायण खरात यांच्या शेतात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. अनिल खरात यांच्या शेतात पाणबुडी मोटार पंपाला जोडलेली १५ फूट केबल वायर आणि दोन पाईप छड्या असा अंदाजे १ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. तर सोपान खरात यांच्या शेतातील बोअरवेल आणि विहिरीला जोडलेली सुमारे ६० फूट केबल वायर चोरट्यांनी लंपास केली.

KattaNews जाहिरात 3

साखरखेर्डा परिसरात यापूर्वीही अनेक गावांच्या शिवारात शेतकऱ्यांच्या साहित्याला चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. रताळी, मोहाडी, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, गुंज आणि सावंगी भगत परिसरात सोलार पॅनलवरील केबल वायर चोरी करून पॅनलची नासधूस केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. काही शेतकऱ्यांचे मोटार पंपही चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी यापूर्वी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.

KattaNews जाहिरात 4

मात्र, शेतातील साहित्य चोरीच्या घटनांचा अद्याप तपास लागला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतीसाठी आवश्यक असलेली मोटार, केबल, सोलार यंत्रणा यांसारख्या साहित्याचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आधीच नैसर्गिक संकटांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता चोरीच्या घटनांचे नवे संकट उभे राहिले आहे.

शिंदी येथील चोरी प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल भारती उदासी यांनी एन.सी. रिपोर्ट दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिट जमादार निवृत्ती पोफळे करीत आहेत.

साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वारंवार घडणाऱ्या शेतातील चोरीच्या घटनांमुळे शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन शेतातील साहित्य चोरी करणाऱ्यांचा शोध घ्यावा, तसेच रात्रीच्या वेळी शिवारात पोलीस गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा!

✅ WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

📢 आपल्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा!

आपल्या गावातील घटना, समस्या, नागरिकांच्या तक्रारी आणि महत्त्वाच्या घडामोडी Katta News पर्यंत पोहोचवा. स्थानिक बातम्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा.

Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

हे देखील वाचा

बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि स्थानिक घडामोडींसाठी आत्ताच भेट द्या 👉 https://kattanews.in/

Katta News – बातमी आपल्या गावाची, आवाज आपल्या माणसांचा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून महाआरती

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव राजात बालाजी मंदिरात महाआरती; शिवसैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग!

मेहकर तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग आणि रेशन कार्ड प्रकरण

मेहकर तहसीलच्या पुरवठा विभागात दलालांचा सुळसुळाट! रेशन कार्डच्या नावाखाली नागरिकांची लूट; CCTV तपासण्याची मागणी

देऊळगाव राजा पोलीस ठाणे आणि १४ लाखांच्या सायबर फसवणुकीची बातमी

पुलवामा प्रकरणाचा बनाव, पोलीस असल्याची बतावणी अन् अटकेची धमकी; देऊळगाव राजातील निवृत्त बँक व्यवस्थापकाला १४ लाखांचा गंडा!

देऊळगाव राजा येथे दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख रुपयांची रोकड चोरी

देऊळगाव राजा शहरात भरदिवसा चोरी; आधार अपडेट करण्यासाठी दुकानात गेले अन् दुचाकीच्या डिक्कीतून १.८० लाख लंपास!

डोणगाव ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्यास गजानन मवाळ यांचा नकार

दुसऱ्या ग्रामपंचायतीचा पदभारही नाही, तरी डोणगावचा पदभार घेण्यास नकार; गजानन मवाळ यांच्या भूमिकेने प्रशासकीय पेच!

खडकपूर्णा प्रकल्पातील शेतीच्या मोटारी बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करणारे शेतकरी

आधी अवैध रेती उपसा बंद करा, मगच मोटारी बंद करा! खडकपूर्णा प्रकल्पावर शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Leave a comment