KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

लग्नाच्या दोन दिवसांत नवरी गायब! तरुणाला गंडवून फरार झालेल्या महिलेला पोलिसांनी असे पकडले

On: November 16, 2026 12:51 PM
Follow Us:
बुलढाण्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या नवरीला धाड पोलिसांनी अटक केली

बुलढाणा | भागवत गायकवाड 

KattaNews जाहिरात 1

लग्नासाठी सुंदर मुलगी दाखवतो, मात्र त्यासाठी खर्च करावा लागेल, असे आमिष दाखवून तरुणाला विवाहाच्या जाळ्यात ओढायचे आणि लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरीने रोख रक्कम व ऐवज घेऊन पोबारा करायचा, असा फसवणुकीचा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. धाड पोलिसांनी या विवाह फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश करत मुख्य महिला आरोपी सविता सांगळे आणि नारायण किसन आंधळे या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, फरार नवरीला पकडण्यासाठी पोलिसांनी दुसऱ्या लग्नाचे आमिष दाखवत अनोखा सापळा रचला.

KattaNews जाहिरात 2

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील रहिवासी नारायण किसन आंधळे याने एका तरुणाशी संपर्क साधला होता. त्याला लातूर येथील सविता अण्णा सांगळे हिचा फोटो दाखवून तिच्यासोबत विवाह लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. या विवाहाच्या मोबदल्यात दीड लाख रुपये देण्याचे ठरल्याची माहिती समोर आली आहे.

KattaNews जाहिरात 3

तरुणाचा विश्वास संपादन करण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 रोजी दुधा येथील मर्दडी देवी संस्थानमध्ये विवाह सोहळा पार पडला. मात्र, हा विवाह पूर्वनियोजित फसवणुकीचा भाग असल्याचा आरोप आहे. लग्नानंतर अवघ्या दोन दिवसांत सविता सांगळे ही तरुणाच्या राहत्या घरातून साहित्य आणि ऐवज घेऊन पसार झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणाने 6 सप्टेंबर 2026 रोजी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

KattaNews जाहिरात 4

या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 61(2) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन धाडचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलीस अंमलदार समाधान देशमाने आणि शांताराम जाधव यांच्या मदतीने तांत्रिक तपास करण्यात आला. या तपासातून नारायण किसन आंधळे याला अंढेरा हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.

दरम्यान, या प्रकरणातील महिला आरोपी सविता सांगळे ही सतत आपले ठिकाण बदलत असल्याने तिला पकडणे पोलिसांसमोर आव्हान होते. ती परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला फोन करून दुसऱ्या एका सधन तरुणाशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला. या विवाहासाठी दोन लाख रुपये देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

पैशांच्या आमिषाला प्रतिसाद देत महिला आरोपी भेटीसाठी तयार झाली. ठरलेल्या भेटीसाठी ती आली असता 3 नोव्हेंबर 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. पोलिसांनी रचलेल्या या अनोख्या सापळ्यामुळे फरार महिला आरोपी अखेर जाळ्यात अडकली. न्यायालयाने तिचीही रवानगी कारागृहात केली आहे.

धाड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लग्नाच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करणाऱ्या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. विवाहासाठी मध्यस्थामार्फत स्थळ सुचवले जात असताना संबंधित व्यक्तींची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणे आवश्यक आहे. लग्नाच्या नावाखाली पैशांची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवा!

स्थानिक घडामोडी, क्राईम न्यूज, राजकारण आणि महत्त्वाचे अपडेट्स थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

✅ WhatsApp ग्रुप JOIN करा

📢 ही बातमी शेअर करा!

लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून इतरांना सावध करण्यासाठी ही बातमी आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांसोबत शेअर करा.

📰 संबंधित बातम्या वाचा

KattaNews.in – बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या.

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर लोणार शेतकऱ्यांसाठी उतावळी आणि पिंपळनेर धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय

मेहकर-लोणारच्या शेतकऱ्यांना दिलासा! दोन धरणांतील पाणी शेतीसाठी उपलब्ध; ६०० हेक्टरला होणार फायदा

टाकरखेडा मुसलमान येथे गोपाल पवार यांच्या मृत्यू प्रकरणी घटनास्थळी दाखल पोलीस अधिकारी

टाकरखेडा मुसलमानमध्ये गोपाल पवार यांची हत्या; ३० वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ, DYSP घटनास्थळी

धाड पोलिसांनी नाकाबंदीत हस्तगत केलेली चोरीची बैलजोडी आणि लोखंडी बैलगाडी

धाड पोलिसांची नाकेबंदी ठरली गेमचेंजर! रात्री बैलजोडी चोरीला, पहाटे नाकाबंदीत चोर पकडला!

अंढेरा पोलीस महिला अंमलदार ज्योत्स्ना गवई यांनी तीन वर्षीय चिमुरड्याला पालकांकडे सुखरूप सोपवले

एसटी बसमध्ये रडणाऱ्या ३ वर्षीय चिमुरड्याला महिला पोलिसांनी दिला आधार; अंढेरा पोलिसांची समयसूचकता!

बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ९९ कोटींच्या निधी वाटपावरून लहान कंत्राटदारांचा आरोप

९९ कोटींचा निधी आला, पण लहान कंत्राटदारांची बिले थकली! बुलढाण्यात बांधकाम विभागावर दुजाभावाचा आरोप

साखरखेर्डा येथील १६ वर्षीय सिद्धार्थ इंगळे याचा तापानंतर मृत्यू

आधी ८ वर्षांचा चिमुकला, आता १६ वर्षीय विद्यार्थी… साखरखेर्डा येथे तापाच्या घटनांनी चिंता वाढवली; १० दिवसांच्या उपचारानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू

Leave a comment