हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा खामगावात मृत्यू; नातेवाईकांची खुनाच्या चौकशीची मागणी

On: September 4, 2026 2:56 PM
Follow Us:
शेगावमध्ये महालक्ष्मी मूर्ती खरेदीसाठी आलेले व्यावसायिक विकास वाणी यांचा खामगावात मृत्यू
खामगाव | कट्टा न्यूज नेटवर्क 

शेगाव येथे महालक्ष्मी मूर्तीचे मुखवटे व मूर्ती खरेदी करण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील व्यावसायिकाचा खामगाव शहरातील अग्रसेन चौकात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, ३ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. विकास रामदास वाणी (वय ४३, रा. गुलमंडी, छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. दरम्यान, जुन्या बिलाच्या वादातून मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी ज्येष्ठागौरी पूजनासाठी लागणारे महालक्ष्मी मूर्तीचे मुखवटे व मूर्ती खरेदी करण्यासाठी विकास वाणी हे आपल्या सहकाऱ्यांसह शेगाव येथे आले होते. ३ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे चार वाजता ते खामगाव येथे पोहोचले. त्यांनी अग्रसेन चौकाजवळील अतिथी लॉजमध्ये ११४ क्रमांकाची खोली घेतली होती.

सकाळी फिरण्यासाठी बाहेर गेले असता अग्रसेन चौक परिसरात विकास वाणी अचानक कोसळले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर लॉजमधील कर्मचारी संजय धानसिंग राठोड यांनी खामगाव शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक नोंदीनुसार, या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण चव्हाण करीत आहेत.

दरम्यान, मृत विकास वाणी यांचे नातेवाईक रमेश्वर लक्ष्मण चौधरी यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, शेगाव येथील सागर खांझोडे आणि इतर चार ते सहा अज्ञात व्यक्तींनी जुन्या बिलाच्या कारणावरून विकास वाणी यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून एका कारखान्यात नेण्यात आले.

तेथे विकास वाणी यांच्या पोटाला चाकू लावून धमकावण्यात आले. तसेच त्यांच्यावर मारहाण करून वाहनातील सर्व माल खाली उतरवून घेतला. याशिवाय उर्वरित १ लाख ८६ हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रेही बळजबरीने घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संबंधित वाहनाचा क्रमांक एमएच २० ईएल १९०६ असून, ते अशोक लेलँड मालवाहू वाहन असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहनचालकाचे नाव नूर शेख असल्याची माहिती आहे.

विकास वाणी यांच्याकडे सुरुवातीला ५ लाख ४० हजार रुपये रोख रक्कम होती. त्यापैकी गणेशपूर येथील गणपती, सुमित कांबळे आणि सूरज खांझोडे यांच्याकडून ३ लाख ६४ हजार रुपयांचा महालक्ष्मी मूर्तीचा माल खरेदी करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित १ लाख ८६ हजार रुपये त्यांच्याकडे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

मारहाणीनंतर विकास वाणी तेथून निसटून खासगी वाहनाने खामगावच्या दिशेने आले, तर रमेश्वर चौधरी हे वाहनचालकासोबत खामगाव रोडवरील पेट्रोल पंपाजवळ थांबले होते. सकाळी सुमारे ८ वाजून ४० मिनिटांनी विकास वाणी यांचा भाऊ योगेश वाणी यांनी रमेश्वर चौधरी यांना फोन करून विकास यांचा अग्रसेन चौकात मृत्यू झाल्याची माहिती दिली.

या घटनेमागील नेमके कारण काय, विकास वाणी यांच्यावर प्रत्यक्षात मारहाण झाली होती का, तसेच त्यांच्या मृत्यूचा आणि तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाचे : पोलिसांनी सध्या या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मारहाण, धमकी, रोख रक्कम व कागदपत्रे बळजबरीने घेण्याचे आरोप हे नातेवाईकांनी तक्रारीत केलेले असून, या आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

ताज्या स्थानिक बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

बुलढाणा, खामगाव, शेगाव आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

Join WhatsApp Group

तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा

तुमच्या गावात, शहरात किंवा परिसरात घडणारी महत्त्वाची घटना, समस्या, सामाजिक उपक्रम किंवा स्थानिक बातमी कट्टा न्यूज सोबत शेअर करा.

बातमी पाठवा आणि तुमच्या परिसराचा आवाज बना!

Related News

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

डोणगावातील दोन मित्रांचा नागापूर पुलाजवळ अपघातात मृत्यू

दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू; डोणगावात एकाच वेळी अंत्यविधी

कल्याणी अमोल भाकरे यांना राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार

कल्याणी अमोल भाकरे यांना मोठा सन्मान; राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकार छोटू कांबळेंना पत्रकारिता पुरस्कार २०२६ जाहीर झाल्यानंतर प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

पत्रकार छोटू कांबळेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६; प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

मोताळ्यात महावितरणविरोधात आमरण उपोषण करताना पृथ्वीराज गायकवाड

महावितरणच्या मनमानीविरोधात मोताळ्यात आमरण उपोषण; पृथ्वीराज गायकवाड मैदानात

लोणारमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी २० वर्षीय संशयिताला अटक

लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा; २० वर्षीय आरोपीला अटक, पाच दुचाकींसह १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सव, पोळा, कावड आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; १२ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव

Leave a Comment