हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दोन जिवलग मित्रांचा अपघातात मृत्यू; डोणगावात एकाच वेळी अंत्यविधी

On: September 4, 2026 8:25 AM
Follow Us:
डोणगावातील दोन मित्रांचा नागापूर पुलाजवळ अपघातात मृत्यू
मेहकर प्रतिनिधी |कट्टा न्यूज नेटवर्क 

डोणगावातील लक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या दोन जिवलग मित्रांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. २ सप्टेंबरच्या रात्री नागापूर पुलाजवळ झालेल्या या अपघातात शेख साहिल शेख जफर आणि शेख शाकिब शेख शकील कुरेशी यांचा मृत्यू झाला. ३ सप्टेंबर रोजी दुपारी दोघांवर एकाच वेळी दफनविधी करण्यात आला. यावेळी असंख्य नागरिकांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७:४५ वाजता शेख साहिल आणि शेख शाकिब हे दोघे मोटारसायकल क्रमांक टीएन ०१ ईजी १४७६ वरून मेहकरकडे जात होते. मुंबई-नागपूर राज्य महामार्गावर नागापूर पुलाजवळ ते काही कारणाने थांबले असताना मेहकरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर क्रमांक एनएल ०१ एससी ३९८२ ने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत दोन्ही मित्र रस्त्याच्या खाली फेकले गेले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, मेहकरकडून डोणगावकडे येणारे अमोल धोटे आणि त्यांच्या मित्रांनी जखमींना मदत केली. त्यांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेमुळे दोन्ही मित्रांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ३ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २:३० वाजता दोघांचा एकाच वेळी दफनविधी करण्यात आला. जिवलग मित्रांना एकाच वेळी अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, दोन्ही मित्रांच्या कुटुंबीयांप्रती नागरिकांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

📲 महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा!

बुलढाणा, अकोला, वाशिम आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानिक बातम्या थेट आपल्या मोबाईलवर मिळवा.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

📰 KattaNews.in वर बातम्या वाचा आणि शेअर करा!

ही बातमी आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला भेट देत रहा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कल्याणी अमोल भाकरे यांना राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार

कल्याणी अमोल भाकरे यांना मोठा सन्मान; राष्ट्रमाता माँ जिजाऊ नारीशक्ती राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

पत्रकार छोटू कांबळेंना पत्रकारिता पुरस्कार २०२६ जाहीर झाल्यानंतर प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

पत्रकार छोटू कांबळेंना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२६; प्रतापराव जाधवांच्या हस्ते सत्कार

मोताळ्यात महावितरणविरोधात आमरण उपोषण करताना पृथ्वीराज गायकवाड

महावितरणच्या मनमानीविरोधात मोताळ्यात आमरण उपोषण; पृथ्वीराज गायकवाड मैदानात

लोणारमध्ये दुचाकी चोरीप्रकरणी २० वर्षीय संशयिताला अटक

लोणारमध्ये दुचाकी चोरीचा छडा; २० वर्षीय आरोपीला अटक, पाच दुचाकींसह १.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई

गणेशोत्सव, पोळा, कावड आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर धाड पोलिसांची मोठी प्रतिबंधात्मक कारवाई; १२ सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव

रविकांत तुपकरांची महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; रविकांत तुपकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Leave a Comment