दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

मलकापूर पांग्र्यात मध्यरात्री सराफा दुकान फोडले; चोरट्यांचा डाव फसला, एक संशयित पोलिसांच्या ताब्यात

On: September 2, 2026 7:57 AM
Follow Us:
मलकापूर पांग्रा येथील दीपाली ज्वेलर्समध्ये चोरीची घटना
मलकापूर पांग्रा |समाधान सरकटे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथे मध्यरात्री चारचाकीतून आलेल्या सुमारे पाच चोरट्यांनी सराफा दुकानाचे शटर आणि कुलूप कटरने तोडून आत प्रवेश केला. दुकानातील रोकड आणि डीव्हीआर घेऊन चोरटे पसार झाले; मात्र लॉकरमधील मौल्यवान दागिने सुरक्षित राहिल्याने मोठी चोरी टळली. चोरीनंतर पळून जाताना चोरट्यांनी वापरलेले वाहन नादुरुस्त झाले आणि ते सोडून दुसऱ्या वाहनातून पलायन केले. या वाहनाजवळ मिळालेल्या वस्तूंमुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, नाकाबंदीदरम्यान जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती असून, इतर संशयितांचा शोध सुरू आहे.

📲 महाराष्ट्रातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा!

महत्त्वाच्या स्थानिक बातम्या आणि ताजे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

👉 WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

ही घटना ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर मलकापूर पांग्रा येथे घडली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री अडीच ते तीनच्या सुमारास सुमारे पाच जण चारचाकी वाहनातून गावात आल्याचे दिसून आले.

चोरट्यांनी दीपाली ज्वेलर्सचे शटर आणि कुलूप कटरच्या साहाय्याने तोडले आणि दुकानात प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील सुमारे दीड हजार रुपयांची रोकड आणि दुकानातील डीव्हीआर घेऊन ते पसार झाले.

मात्र, दुकानाच्या लॉकरमध्ये ठेवलेले मौल्यवान दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. लॉकर सुरक्षित राहिल्याने मोठी आर्थिक हानी टळली. चोरी करताना चोरट्यांनी दुकानातील काचा, शोकेस आणि इतर साहित्याची तोडफोड केली.

चोरट्यांनी शेजारील दुकानांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य केले. कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत सुमारे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन-तीन दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा येथून पलायन करत असताना हे वाहन किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत नादुरुस्त झाले. त्यानंतर चोरट्यांनी ते वाहन तिथेच सोडले आणि दुसऱ्या वाहनातून जालन्याच्या दिशेने पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे.

नादुरुस्त वाहनाजवळ गल्ल्यातील काही साहित्य तसेच दुकानमालक वसंतराव उदावंत यांचा फोटो आढळून आला. ही बाब लक्षात आल्यानंतर नागरिकांनी उदावंत यांच्याशी संपर्क साधला.

उदावंत यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे, दुय्यम ठाणेदार संदीप मेधाने आणि बीट जमादार निवृत्ती पोफळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत न्यायवैद्यक पथक आणि श्वानपथकानेही घटनास्थळी पाहणी केली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाला सुरुवात केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, चोरीचे वाहन आणि घटनास्थळी मिळालेल्या वस्तू तपासल्या जात आहेत.

दरम्यान, नाकाबंदीदरम्यान जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, सन २००० पासून आतापर्यंत दीपाली ज्वेलर्समध्ये अशाच प्रकारची चोरी चार वेळा झाल्याचे दुकानमालकांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या घटनेनंतर मलकापूर पांग्रा परिसरातील व्यापाऱ्यांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.

🔗 संबंधित बातम्या

📢 तुमच्या परिसरातील बातमी आमच्यापर्यंत पोहोचवा.

स्थानिक घडामोडी, अपघात, प्रशासन किंवा नागरिकांच्या प्रश्नांशी संबंधित महत्त्वाची माहिती असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

ताज्या महाराष्ट्रातील बातम्यांसाठी Katta News सोबत जोडलेले राहा.

👉 WhatsApp ग्रुप जॉईन करा

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

लोणार उपोषण स्थगित, पोलीस ठाण्यासमोर चर्चा करताना शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व पोलीस अधिकारी

लोणार उपोषण स्थगित: पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर अवैध दारू, गुटखा, मटक्याविरोधात १० दिवसांची मुदत

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment