दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

On: September 1, 2026 8:13 AM
Follow Us:
समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला धडक; अपघातात चालकाचा मृत्यू

सिंदखेड राजा |समाधान सरकटे 

समृद्धी महामार्गावर नगरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहनाने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. भागवत महादेव सानप (वय ३३, रा. राणेगाव, ता. शेवगाव, जि. नगर) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, OD 19 U 6157 क्रमांकाचा कंटेनर समृद्धी महामार्गावरून जात होता. दरम्यान, नगरकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या MH 16 CD 5252 क्रमांकाच्या आयशर वाहनाने समोरील कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात आयशर चालक भागवत सानप यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती सीआरओ संभाजीनगर यांनी पहाटे फोनद्वारे पोलिसांना दिली.

माहिती मिळताच मलकापूर टीएबी अंतर्गत वाकी येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन तसेच पोलीस कर्मचारी इरफान शेख, आकाश यादव आणि राहुल कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलीस पथक पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने घटनास्थळी तातडीने बॅरिकेडिंग करण्यात आले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.

मृत भागवत सानप यांचा मृतदेह १०८ रुग्णवाहिकेद्वारे शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला.

या प्रकरणाची नोंद सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करीत आहेत.

📲 ताज्या बातम्यांसाठी कट्टान्यूज WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

सिंदखेड राजा, बुलढाणा आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या थेट WhatsApp वर मिळवा.


👉 Join WhatsApp Group

📰 संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

साखरखेर्डा महिलेवर हल्ला करणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडले

साखरखेर्ड्यात भरदिवसा महिलेच्या घरात घुसून गळा दाबण्याचा प्रयत्न; आरडाओरड ऐकून नागरिकांनी आरोपीला पकडले

साखरखेर्डा तालुका मागणीवर बोलताना माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगण

‘शासनाचं आवतन म्हणजे जेवण वाढल्याशिवाय खरं नाही’; साखरखेर्डा तालुका मागणीवर डॉ. राजेंद्र शिंगणे स्पष्टच बोलले

Leave a comment