नारायण आरू पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड (risod) शहरा पासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर येथे अल्पवयीन मुलीवर girl अत्याचार करून बलात्कार rape news केल्याची घटना 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला घडली.पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहरा पासून जवळच असलेल्या मुंगसाजी नगर येथील आदिवासी समाजाच्या 13 वर्ष 9 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर त्यास भागातील तिघांनी अत्याचार करून बलात्कार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यशालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी उभी असताना मुंगसाजी नगर येथील गणेश फुफाटे, सूर्यभान फुफाटे, पंढरी फुफाटे हे माझ्याजवळ आले व मला पंढरी फुफाटे यांनी उचलले व मुंगसाजी पासून जवळच असलेल्या टेकडीवर असलेल्या झोपडीत नेले व आमच्या मागोमाग गणेश फुफाटे व सूर्यभान फुफाटे सुद्धा आले.पंढरी फुफाटे यांनी माझ्यावर रात्रभर अत्याचार करून बलात्कार केल्याचे तक्रारीत अल्पवयीन मुलीने म्हटले आहे.
दिनांक 21 ऑगस्ट 2024 ला घरी परतल्यानंतर अल्पवयीन मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.सदर घटनेची तक्रार देण्यासाठी अत्याचार ग्रस्त अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांनी रिसोड पोलीस स्टेशन गाठून रिसर्च तक्रार दाखल केली असता रिसोड पोलिसांनी अपराध नंबर 395/2024 कलम 137(2),3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल केलाा असून तिने आरोपींना पोलिसांनी तात्काळाळ अटक केली अत्याचार ग्रस्त मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता तिच्यावर बलात्कार झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्याचे दिसून आले.
सदर गुन्ह्यात कलम 64(2)(आय),65(1) भारतीय न्याय संहिता 2023 तसेच सहकलम 4,5(एन)6,8,12 पोक्सो अधिनियम या कलमाची वाढ करण्यात आली आहे.सदर तपास रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गटे,पोलीस कर्मचारी सुशील इंगळे रुपेश मस्के गणेश जाधव व रिसोड पोलीस करीत आहेत.