maharashtra cabinet expansion | मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील ६ खासदारांची या मंत्री पदासाठी वर्णी.

maharashtra cabinet expansion
maharashtra cabinet expansion

 

 

 

maharashtra cabinet expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ९) सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यात मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये महाराष्ट्रातील या ६ खासदारांची मंत्री पदासाठी वर्णी लागली आहे.

 

 

maharashtra cabinet expansion

 

नितीन गड्करी

मतदार संघ :- नागपूर

 

१९८१ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पुढे १९८९, १९९६ आणि २००२ मध्ये ते नागपूर पदवीधर विधानपरिषद मतदारसंघातून आमदार झाले. १९९६मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र, १९९९मध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, २००४मध्ये प्रदेशाध्यक्ष, भाजप (महाराष्ट्र), २००९मध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. २०१४, २०१९ आणि २०२४ असे सलग तीन वेळा ते नागपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. २०१४ ते २०२४ ते दरम्यान त्यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री म्हणून छाप सोडली. विकासकामांच्या धडाक्यामुळे केंद्रातील सर्वात ‘अॅक्टिव्ह मंत्री असे नितीन गडकरी यांना संबोधण्यात येते. देशभरात महामागांचे जाळे उभारण्यासाठी गडकरी प्रयत्नरत आहेत. त्यांनी महामार्गाचा चेहरामोहराच बदलला आहे. जलसंपदामंत्री म्हणूनही त्यांनी देशातील सिंचन प्रकल्पांना गती दिली.

 

 

रामदास आठवले

राज्यसभा सदस्य

रामदास आठवले यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अगलगाय या गावातील एका गरीच बौद्ध कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. प्राथमिक शिक्षण डालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे पडाव्यांच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. १९७२ मध्ये दलित पंधरची स्थापना आली. ते पैंथरमध्ये सक्रिय झाले. तेथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले. शिवसेनेशी च सरकारशी त्यांनी संघर्ष केला. १९९० मध्ये राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. मुंबई उत्तर मध्य आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदारसंघांतून ते खासदार झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत. मागच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक कल्याण मंत्री होते.

 

पियुष गोयल

मतदार संघ :- मुंबई उत्तर

सलग तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद.

माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल आणि भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे पुत्र पीयूष गोयल यांनी तरुण वयातच स्वतःला भाजपच्या संघटनात्मक कामात झोकून दिले. २०१० आणि २०१६ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले, गोयल यांनी कोळसा, ऊर्जा, रेल्वे, वाणिज्य, कॉर्पोरेट अफेअर्स अशा खात्यांचा कार्यभार सांभाळलेला आहे. संसदेच्या अर्थ, संरक्षणविषयक विविध समित्यांवरही काम केले आहे. गेली ३५ वर्षे भाजपमध्ये विविध पदांवर आणि राष्ट्रीय कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या गोयल यांनी राष्ट्रीय खजिनदारपदही सांभाळले आहे. राज्यसभेचे सभागृह नेतेपदही त्यांनी भूषविले आहे. माटुंगा येथील डॉन बॉस्को शाळेत ते शिकले. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत देशपातळीवर आणि विधि पदवी परीक्षेतही त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यांनी स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि बैंक ऑफ बडोदाच्या संचालक मंडळातही काम केले आहे. त्यांचे वडील वेदप्रकाश गोयल हे अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

 

 

रामदास आठवले

राज्यसभा सदस्य

एकही खासदार नसताना मंत्रिपद

रामदास आठवले यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील अगलगाय या गावातील एका गरीच बौद्ध कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरविले. प्राथमिक शिक्षण डालेवाडीत (तासगाव, जि. सांगली) झाल्यानंतर पुढे काकांकडे मुंबईत शिक्षण घेण्यासाठी गेले. पुढे पडाव्यांच्या सिद्धार्थ विहार वसतिगृहात राहायला गेले. त्यांची तेथे खऱ्या अर्थाने जडणघडण झाली. १९७२ मध्ये दलित पंधरची स्थापना आली. ते पैंथरमध्ये सक्रिय झाले. तेथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतही ते सहभागी झाले. शिवसेनेशी च सरकारशी त्यांनी संघर्ष केला. १९९० मध्ये राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला. आठवलेंनी प्रारंभी महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम केले. मुंबई उत्तर मध्य आणि नंतर पंढरपूर या लोकसभा मतदारसंघांतून ते खासदार झाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ते तिसऱ्यांदा मंत्री होत आहेत. मागच्या मंत्रिमंडळात ते सामाजिक कल्याण मंत्री होते.

 

 

प्रतापराव जाधव

मतदारसंघ – बुलढाणा 

रहिवासी असलेले प्रतापराव जाधव यांचा तालुका संघटक ते केंद्रीय मंत्री असा प्रवास राहिला आहे. ते यंदा चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. जाधव यांनी १९८६ पासून तालुका संघटक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९० मध्ये ते बुलढाणा जिल्हा शिवसेनाप्रमुख झाले. २०१४ ते २०१९ या काळात शिवसेना संपर्कप्रमुख म्हणूनही त्यांच्यावर जबाबदारी होती. मेहकर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशी त्यांची वाटचाल राहिली. १९९० मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघात ते पराभूत झाले. १९९५ मध्ये येथूनच आमदार झाले. १९९७ ते १९९८ दरम्यान त्यांनी क्रीडा पाटबंधारे राज्यमंत्री, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सांभाळले. १९९९ मध्ये दुसऱ्यांदा, २००४ मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले. २००९ ते २०२४ असे सलग चार वेळा ते बुलढाणा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले. यावेळी त्यांनी शिंदे सेनेकडून निवडणूक लढवली व विजयी झाले.

 

 

रक्षा खडसे

मतदारसंघ – रावेर

कोथळी तालुका. मुक्ताईनगर येथील सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास आहे रक्षा निखिल खडसे यांचा. खडसे या आता तिसयांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. खडसे यांचे खेडदिगर, ता. शहादा (जि. नंदुरबार) हे माहेर. वयाच्या २३ व्या वर्षी त्या कोथळी, ता. मुक्ताईनगरच्या सरपंच झाल्या. त्यानंतर वयाच्या २५ व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर शिक्षण समितीच्या सभापतीही झाल्या. त्यांना दोन अपत्ये आहेत. मुलगी क्रिशिका आणि मुलगा गुरुनाथ, पती निखिल खडसे यांचे निधन झाले, त्यावेळी गुरुनाथ हा दीड वर्षांचा होता. पती निधनानंतर खचून न जाता त्या सासरे आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीने राजकारणात हिमतीने उभ्या राहिल्या. वयाच्या २७ व्या वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या, दोन वेळा खासदार राहिल्याने प्रशासन हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. मतदारसंघात कुठल्याही गटा-तटात न पडता आपले कार्य करीत राहणे, हा त्यांचा स्वभाव, त्यामुळे जनतेने त्यांना निवडून दिले.

 

 

 

मुरलीधर मोहोळ

 

मतदार संघ :- पुणे

 

मुरलीधर मोहोळ मूळचे मोठा गावचे, कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू आली. त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर भाजप सरचिटणीस, पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य (२००२), महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक (२००७, २०१२, २०१७), महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद (२०२७-२०१८) त्यांनी भूषवले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून (२०१७-१८) त्यांनी काम केले. २०१९- २२ ते पुण्याचे महापौर होते. अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पीएमपीएमएल संचालक, पीएमआरडीए सभासद होते. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक २०१९ मध्ये लडवली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा प्रथमच त्यांना खासदारकी मिळाली आहे. व त्यात त्यांची मंत्रिपदासाठी ही वर्णी लागली आहे.