
accident : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सोहळ्याचा तिसऱ्या टप्प्यातील शुभारंभ बुधवारी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात होता. या कार्यक्रमाला जाणाऱ्या महिलांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. २० फूट खोल दरीत ही बस कोसळली आहे. माणगाव तालुक्यातील मांजरोने घाटात हा अपघात झाला आहे. या अपघातात ८ महिला जखमी झाल्या असून एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. रानवडे कोंड येथून २९ महिला लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी माणगावला निघाल्या होत्या. मांजरोने घाटात येताच चालकाचे नियंत्रण सुटले व बस खोल दरीत कोसळली. यामध्ये जखमी महिलांवर माणगाव mangaon उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मेळाव्यासाठी लाडक्या बहिणींना गावागावांतून आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या हजारो बसेस सोडल्या आहेत.