हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चौथा ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात; वृक्षारोपणासह शहीद पंढरीनाथ नप्ते यांना अभिवादन

On: August 15, 2026 9:03 PM
Follow Us:
चौथा ग्रामपंचायतीत ८०वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

बुलडाणा : भागवत गायकवाड 

ग्रामपंचायत कार्यालय चौथा येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासक सौ. शारदा गजानन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी म. पू. मा. शाळा, चौथा येथील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने यावेळी ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

यावेळी शहीद पंढरीनाथ नप्ते यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

तसेच श्री. तेजराव एस. नप्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि कर्मचारी मंडळी उपस्थित होती.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून देशभक्ती, शहीदांच्या त्यागाचे स्मरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

🇮🇳 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
चौथा आणि परिसरातील ताज्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.
 
हे पण वाचा..
 
 
 
 

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन

बुलढाण्यात जिल्हा नियोजन समितीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; १.५८ कोटींच्या निधीतून आधुनिक सुविधा

Namo Shetkari Yojana 2000 Installment Update Katta News

Namo Shetkari Yojana : ₹२००० चा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार; राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहा संपूर्ण माहिती!

महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट - IMD नवा अंदाज

Maharashtra Weather Update : पुढील ४८ तास धोक्याचे! महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट; IMD चा नवा अंदाज

संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी जाणाऱ्या ऑटोचा सुलतानपूर-भानापूर मार्गावर अपघात

संत गजानन महाराजांच्या पालखी दर्शनाला जात असताना काळाचा घाला; ऑटो रिक्षा विद्युत खांबावर आदळली, एका भाविकाचा जागीच मृत्यू

Nashik Earthquake Today 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप

Nashik Earthquake Today: नाशिकमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का! 3.4 रिश्टर स्केलची नोंद; नेमकं काय घडलं?

गवंढाळा ग्रामपंचायत अधिकारी निलंबित

“जनतेच्या पैशांचा हिशेब द्यावाच लागेल!”; गवंढाळा ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर अखेर निलंबनाची कारवाई

Leave a Comment