हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्ड्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात; श्री प्रल्हाद महाराज संस्थान व श्री पलसिद्ध महास्वामी मठात हजारो भाविकांची उपस्थिती

Follow Us:
साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त उपस्थित भाविक

साखरखेर्डा | प्रा. दिलीप नाईकवाड :

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे श्री प्रल्हाद महाराज संस्थान तसेच श्री पलसिद्ध महास्वामी मठात गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पहाटेपासूनच दोन्ही धार्मिक स्थळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. साखरखेर्ड्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गुरुदर्शन घेत महोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरण पूजन, महापूजा, काकड आरती, गुरुदीक्षा, प्रवचन, भजन-कीर्तन आणि महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिवसभर भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला होता.

श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मानवाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा खरा मार्गदर्शक म्हणजे गुरु होय. गुरुशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा ही जगाला दिशा देणारी परंपरा आहे.” व्यासमुनींनी वेदांचे संकलन करून ज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पोहोचविला. त्यामुळे गुरुपौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असेही संबोधले जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.

श्री प्रल्हाद महाराज संस्थानात सकाळी महापूजा, काकड आरती, गुरुचरण पूजन व विविध धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी गुणवंत विद्यार्थी, सेवाभावी व्यक्ती तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भक्तांचा सत्कार करण्यात आला.

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री पलसिद्ध महास्वामी मठ आणि श्री प्रल्हाद महाराज संस्थान या दोन्ही ठिकाणी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती. वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहतूक आणि पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सुरळीतपणे पार पडले.

श्रद्धा, भक्ती, गुरुसेवा आणि आध्यात्मिक विचारांचा संदेश देणारा साखरखेर्ड्यातील गुरुपौर्णिमा महोत्सव भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला. हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर दिवसभर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

📲 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.


👉 WhatsApp Group Join करा

📰 संबंधित बातम्या

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

श्वेता महाले संजय गायकवाड वाद बुलढाणा भाजप शिवसेना

‘लहान मुलगा इकडे, बायको तिकडे, मोठा मुलगा तिकडे…’ ‘तुम्ही शिवसेना वाढवताय की स्वतःचा परिवार?’ श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर थेट निशाणा

चिखली श्वान निर्बीजीकरण मोहिमेत कुत्र्यांना कोंडलेला बंद हॉल

चिखली श्वान निर्बीजीकरण मोहिमेत मोठा घोळ; कोंडवाड्यात कुत्र्यांचा छळ, कुजलेला मृतदेह सापडला

हातभट्टी दारू कारवाई मध्ये धाड पोलिसांनी जप्त केलेले 500 लिटर मोहसडवा रसायन

धाड पोलिसांची मोठी कारवाई! हातभट्टीची दारू बनवण्याचा डाव उधळला, 500 लिटर मोहसडवा रसायन जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील वाळलेली पिके आणि शेतकरी संकट

बुलढाणा शेतकरी संकट: सीमा बदलली म्हणून पाऊसही बदलतो का? शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

Buldhana News: बुलढाणा दुष्काळसदृश यादीतून वगळलेली होरपळलेली शेती

Buldhana News |शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ! 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाणा गायब; तुपकरांचा सरकारला थेट इशारा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा बुलढाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा: बुलढाण्यात शिवसेना आमदारावर FIR दाखल, नवा वाद चिघळला

Leave a Comment