KattaNews नवीन जाहिरात KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

सिंदखेडराजा तालुक्यावर वरुणराजाची दमदार बरसात; शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.५० मिमी पाऊस

Follow Us:
सिंदखेडराजा तालुक्यात मुसळधार पाऊस

सिंदखेडराजा | प्रा.दिलीप नाईकवाड

KattaNews जाहिरात 1

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, लघु व पाझर तलावांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.

KattaNews जाहिरात 2

महसूल विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात काल सरासरी ९८.०१ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये शेंदुर्जन मंडळात सर्वाधिक १२५.५० मिमी पाऊस झाला. साखरखेर्डा मंडळात ११८.०५ मिमी, मलकापूर पांग्रा येथे ९७.०८ मिमी, सिंदखेडराजा येथे ९१.०५ मिमी, दुसरबीड येथे ८९.०८ मिमी, सोनोशी येथे ८३ मिमी तर किनगाव राजा येथे ७२.०३ मिमी पावसाची नोंद झाली.

KattaNews जाहिरात 3

काल रात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर साखरखेर्डा येथील भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली. सवडद येथील कोराडी नदीलाही पूर आला असून, कोराडी धरणातील पाणीसाठा सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अनेक दिवसांपासून कोरडे पडलेले ओढे-नाले पुन्हा खळाळून वाहू लागल्याने परिसरातील जलस्रोतांना मोठा फायदा झाला आहे.

KattaNews जाहिरात 4

पावसामुळे अनेक ठिकाणी विहिरींना पाणी लागल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील भूजल पातळीत वाढ होण्यास या पावसाची मदत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. साखरखेर्डा–मेरा बु. मार्गावरील शिंदी गावाजवळ रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. प्रशासनाने तत्काळ जेसीबीच्या सहाय्याने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली.

या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि मका आदी पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना आवश्यक पाणी मिळाल्याने त्यांची वाढ जोमाने होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र, हवामान विभागाने आणखी पावसाचा अंदाज वर्तविल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदी, नाले आणि धरण परिसरात पाण्याची पातळी वाढल्यास नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.

📲 बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

👉 WhatsApp Group Join करा

बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक बातम्या, हवामान अपडेट्स, शेतीविषयक माहिती आणि सरकारी योजनांच्या ताज्या माहितीसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वरुडी ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद साजरा करताना पदाधिकारी

सिंदखेडराजा तालुक्यातील वरुडी गावाचा राज्यस्तरावर गौरव! मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात २० लाखांचा पुरस्कार जाहीर.

घाटबोरी सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत

घाटबोरी वनक्षेत्रातील सागवान वृक्षतोड प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत; न्यायालयाकडून ३ दिवसांची वनकोठडी

देऊळगाव राजा येथे निकृष्ट रेशन तांदळाच्या निषेधार्थ संतोष भुतेकर यांनी तहसील कार्यालयात तांदूळ भेट दिला

देऊळगाव राजात निकृष्ट रेशन तांदळाचा अनोखा निषेध; पुरवठा अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिला तांदूळ!

बुलढाणा न्यायालयाने चिखलीतील बालिका अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास सुनावला

बुलढाणा न्यायालयाचा मोठा निर्णय! चिखलीतील ८ वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास

आडगाव राजा पाणीपुरवठ्यासाठी पंचायत समिती कार्यालयात ठिय्या देताना ग्रामस्थ

पाणीपुरवठ्यासाठी आडगाव राजा ग्रामस्थांचा सिंदखेडराजा पंचायत समितीत ठिय्या! आठ दिवसांत नळाला पाणी देण्याचे लेखी आश्वासन

सुलतानपूर येथे मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून रोकड आणि शासकीय लॅपटॉपची बॅग चोरी

सुलतानपुरात वाहतूक कोंडीत संधी साधली! मंडळ अधिकाऱ्याच्या कारमधून ५० हजारांची रोकड, शासकीय लॅपटॉप चोरीला

Leave a comment