हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खामगावात बँक व्यवस्थापक व कृषी अधिकाऱ्याला मारहाण; स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल टिकार यांच्यावर गुन्हा

On: July 31, 2026 9:17 AM
Follow Us:
खामगावातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात शाखा व्यवस्थापक आणि कृषी अधिकाऱ्याला मारहाण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल
खामगाव | विशाल गवई 
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गुरुवारी (३० जुलै) सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभार्थी यादीवरून झालेल्या वादानंतर बँकेचे शाखा व्यवस्थापक आणि कृषी अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल विश्वासराव टिकार (पाटील) यांच्याविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माहितीनुसार, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खामगाव शाखेचे व्यवस्थापक शिवाजी तुकाराम कड हे दुपारी कार्यालयीन कामकाजात व्यस्त असताना खातेधारक अमोल विश्वासराव टिकार यांनी कर्जमाफी योजनेबाबत लेखी माहितीची मागणी केली. त्यावेळी कर्जमाफीची लाभार्थी यादी शासनाकडून प्राप्त होत असल्याचे शाखा व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. तसेच अधिक माहितीसाठी कृषी अधिकारी योगेश विजय भुतेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

तक्रारीनुसार, काही वेळानंतर अमोल टिकार पुन्हा बँकेत आले. यावेळी त्यांनी शाखा व्यवस्थापकांशी वाद घालत शिवीगाळ केली आणि चापटा व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हा वाद मिटविण्यासाठी पुढे आलेले कृषी अधिकारी योगेश विजय भुतेकर यांनाही चापट मारून शिवीगाळ करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे काही काळ बँकेतील कामकाज विस्कळीत झाले.

घटनेनंतर शाखा व्यवस्थापक शिवाजी कड यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अमोल विश्वासराव टिकार (पाटील), रा. बोरी अडगाव, ता. खामगाव यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 115(2), 351(2) व 352 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे बुलढाणा, अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी तसेच विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने खामगाव शहर पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करत निषेध व्यक्त केला.

यावेळी बँक युनियनचे पदाधिकारी निलेश खंडारे यांनी कर्तव्य बजावत असलेल्या बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. अशा घटनांवर कठोर कारवाई करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

खामगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी आंदोलकांशी चर्चा करून प्रकरणाचा तपास सुरू असून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व बँक अधिकारी व कर्मचारी शांततेत परतले.

📲 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, शेती, शिक्षण, नोकरी, हवामान आणि स्थानिक घडामोडींचे सर्वात जलद अपडेट मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये आजच सहभागी व्हा.

👉 WhatsApp Group Join करा

टीप : या वृत्तातील माहिती संबंधित पोलिस तक्रार आणि उपलब्ध अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील तपासात नवीन माहिती समोर आल्यास वृत्त अद्ययावत करण्यात येईल.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

हातभट्टी दारू कारवाई मध्ये धाड पोलिसांनी जप्त केलेले 500 लिटर मोहसडवा रसायन

धाड पोलिसांची मोठी कारवाई! हातभट्टीची दारू बनवण्याचा डाव उधळला, 500 लिटर मोहसडवा रसायन जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील वाळलेली पिके आणि शेतकरी संकट

बुलढाणा शेतकरी संकट: सीमा बदलली म्हणून पाऊसही बदलतो का? शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

Buldhana News: बुलढाणा दुष्काळसदृश यादीतून वगळलेली होरपळलेली शेती

Buldhana News |शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ! 18 दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीतून बुलढाणा गायब; तुपकरांचा सरकारला थेट इशारा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा बुलढाणा

संजय गायकवाड विनयभंग गुन्हा: बुलढाण्यात शिवसेना आमदारावर FIR दाखल, नवा वाद चिघळला

उमेश परिहार हत्या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी केलेली अटक

दीड लाखांची सुपारी, दारूत विष मिसळून हत्या; तढेगावातील उमेश परिहार हत्येचा ५ तासांत छडा

सिंदखेडराजामार्गे रेल्वेची मागणी आणि जिजाऊ जन्मभूमी

जिजाऊंच्या जन्मभूमीला रेल्वे कधी? जालना-खामगाव मार्ग सिंदखेडराजामार्गे करण्याची जोरदार मागणी; “विकासाच्या नकाशावर सिंदखेडराजा का नाही?”

Leave a Comment