Buldhana latest news : किराणा दुकानातून बेसन पीठ घेऊन घराकडे जाणाऱ्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार २४ जूनच्या रात्री साडेसातच्या सुमारास स्थानिक पोलिस स्टेशनच्या police station हद्दीत घडला. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी एका दुकानातील सीसीटीव्हीचा आधार घेत – आरोपीचा छडा लावून पुराव्यानिशी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर – आरोपीविरुद्ध पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
येथील ११ वर्षीय मुलगी २४ जूनच्या – रात्री साडेसातच्या सुमारास किराणा दुकानात बेसन पीठ आणण्यासाठी – गेली होती. दुकानातून परत घराकडे जात असलेल्या या चिमुकलीला हेरून या भागातील एका हार्डवेअरसमोर उभ्या असलेल्या संशयित आरोपीने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला व निर्जनस्थळी मुलीला गाठले. दरम्यान, मुलीकडे मोबाइल देत त्यातील मेसेज वाचून दाखविण्याचा बहाणा केला. मुलगी मोबाइलमधील मेसेज वाचून दाखवित असताना आरोपीने तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या चिमकलीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेत घराकडे पळ काढल्याचे तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, घरी पोहोचल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील मुलीने तिच्या आईला आपबिती सांगितली. त्यानंतर ही बाब मुलीच्या वडिलांना समजताच त्यांनी परिसरात आरोपीचा शोध घेतला. मात्र. तो मिळन आला नाही.
सीसीटीव्ही फूटेज तपासले दुसऱ्या दिवशी घटनास्थळावरील एका
दुकानातील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात हा घृणास्पद प्रकार केंद झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या फूटेजसह पीडितेच्या वडिलांनी २५ जून रोजी पोलिसांत तक्रार दिली. सोबतच (एआय इमेज) संबंधित संशयित आरोपीचा चिखली व अमडापूर बाजारात शोध घेतला. संशयित आरोपी गजानन जयसिंग येवले (४८, रा. महीमळ, ता. चिखली) याच्याविरोधात विविध कलमांसह ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली.