हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

सिंदखेडराजात SC उपवर्गीकरण विरोधी विराट मोर्चा; जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले, शासनाला दिला इशारा

On: July 28, 2026 9:48 AM
Follow Us:
सिंदखेडराजा येथे SC उपवर्गीकरणाविरोधात हजारो नागरिकांचा विराट मोर्चा, जय भीमच्या घोषणांनी शहर दणाणले

सिंदखेडराजा | समाधान सरकटे

सिंदखेडराजा शहरात अनुसूचित जाती (SC) उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित प्रक्रियेविरोधात सोमवारी अभूतपूर्व जनआक्रोश पाहायला मिळाला. ‘अनु. जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली हजारो समाजबांधव, महिला, युवक आणि समता सैनिक रस्त्यावर उतरले. निळे झेंडे, संविधानाचे संदेश आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले. शासकीय विश्रामगृहापासून सुरू झालेला हा विराट मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला आणि मुख्यमंत्री यांच्या नावे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

सकाळपासूनच शहरात विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. निळ्या झेंड्यांनी सजलेला परिसर, हातात संविधानाचे फलक आणि घोषणांनी भरलेले वातावरण यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले. अनेकांनी शांततापूर्ण मार्गाने संविधानिक हक्कांसाठी एकजूट दाखवत मोर्चामध्ये सहभाग नोंदविला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

मोर्चामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “जय भीम”, “जय संविधान”, “आरक्षण आमच्या हक्काचं”, “संविधान विरोधी निर्णय मान्य नाही” अशा घोषणांनी शहरातील मुख्य रस्ते दुमदुमून गेले.

मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले. शासनाने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.

यानंतर उपविभागीय कार्यालयासमोरील संत सावता महाराज मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. विविध वक्त्यांनी संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूलभूत तत्त्वांवर भाष्य करत उपवर्गीकरणाला विरोध व्यक्त केला. शासनाने समाजाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

निवेदनामध्ये शासनासमोर अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची सुरू असलेली प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बदर समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करावा तसेच समिती रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली.

राज्यातील अनुसूचित जातींतील बहुतांश समाजघटक उपवर्गीकरणाला विरोध करत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व समाजघटकांचा विश्वास संपादन करून सखोल चर्चा करण्यात यावी, अशी भूमिका मोर्चेकऱ्यांनी मांडली.

अनुसूचित जाती समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तर जाणून घेण्यासाठी राज्यव्यापी सर्वेक्षण करण्यात यावे, त्याचा अहवाल सार्वजनिक करावा तसेच शासकीय आणि निमशासकीय विभागातील अनुसूचित जातींच्या अनुशेषातील सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शिष्यवृत्ती योजनांचा विस्तार, नवीन वसतिगृहे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि उच्च शिक्षणासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

संविधानातील कलम १४, १५(१), १६(१) आणि ३४१ मधील समानता व सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय शासनाने घेऊ नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे मांडली.

मोर्चादरम्यान संपूर्ण शहरात शांतता आणि शिस्त कायम ठेवण्यात आली. विशेष म्हणजे समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण मोर्च्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. वाहतूक व्यवस्था, महिलांची सुरक्षा, मोर्चाची रचना आणि घोषणाबाजी यामध्ये उत्कृष्ट समन्वय दिसून आला. उपस्थित अनेक नागरिकांनी हा सिंदखेडराजातील सर्वाधिक शिस्तबद्ध मोर्चा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मोर्चाचे नेतृत्व ‘अनु.जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, सिंदखेड राजा’च्या पदाधिकाऱ्यांनी केले. विविध आंबेडकरवादी संघटना, महिला प्रतिनिधी, युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सभेच्या शेवटी शासनाने मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

महत्त्वाची माहिती

२९ जुलै रोजी बुलढाणा येथे उपवर्गीकरण विरोधी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याचा दावा करण्यात आला.

📲 KattaNews.in WhatsApp Group

बुलढाणा, महाराष्ट्र, सरकारी योजना, शेती, शिक्षण आणि ब्रेकिंग न्यूज सर्वात आधी मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Group मध्ये आजच सहभागी व्हा.


👉 WhatsApp Group Join करा

संबंधित बातम्या

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणात धाड पोलिसांनी आरोपीला पकडले

धामणगाव मंदिरातील दानपेटी चोरीचा छडा; धाड पोलिसांनी दोन तासांत आरोपीला पकडले, ₹७,५०० मुद्देमाल जप्त

चिखली शाहूनगर परिसरातील अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

फ्लॅट पाहायला गेल्या अन् काळाचा घाला; चिखलीतील शाहूनगरमध्ये ४५ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू

देऊळगावमही शिवारात टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज चोरी

देऊळगावमहीत धाडसी चोरी! शेतातील टिनशेड फोडून 29 हजारांचा ऐवज लंपास; कोंबड्या, गहू, खताच्या पिशव्याही चोरीला

स्वतंत्र विदर्भासाठी मिशन २०२७ मेळाव्यात ॲड. वामनराव चटप यांचे मार्गदर्शन

स्वतंत्र विदर्भासाठी ‘मिशन २०२७’चा निर्धार! सिंदखेडराजातून ॲड. वामनराव चटप यांचा मोठा इशारा; डिसेंबर २०२७पर्यंत राज्य न झाल्यास तीव्र जनआंदोलन

मंडपगाव येथे अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करताना महसूल विभागाची कारवाई

मंडपगावात रेती माफियांवर महसूल विभागाचा मोठा दणका! अवैध रेती वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील १०४६७ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी २०२६

बुलढाणा जिल्ह्यातील १०,४६७ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यादी जाहीर; ‘हे’ काम त्वरित करा अन्यथा लाभ मिळणार नाही

Leave a Comment