हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Buldana news : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ 23 जुलैला साखरखेर्डा बंद

On: July 22, 2026 7:14 PM
Follow Us:
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे 23 जुलै 2026 रोजी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ बंदची घोषणा

साखरखेर्डा | समाधान सरकटे 

Buldana news : दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. बंद शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा युवा अध्यक्ष विशाल श्रीराम गवई यांनी 22 जुलै रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन सादर केले. या निवेदनात दिल्लीतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यात आला असून, लोकशाही मार्गाने शांततापूर्ण बंद आयोजित करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

विशाल गवई यांनी सांगितले की, हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण असेल. संविधानिक मार्गाने आंदोलन करत कायद्याचे पालन केले जाईल. नागरिकांनीही शांतता राखून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

निवेदन देताना विशाल गवई, पुंजाजी मोरे, संदीप इंगळे, प्रवीण गवई, महेंद्र भालके, सोहम गवई, प्रदीप खिल्लारे, किरण इंगळे, उत्तम अडागळे, अविष्कार गवई, कुणाल गवई, वैभव गवई आणि आकाश गवई उपस्थित होते. निवेदनाची प्रत साखरखेर्डा ग्रामपंचायत कार्यालयालाही देण्यात आली आहे.

📢 WhatsApp ग्रुप जॉईन करा
बुलढाणा न्यूज, महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, सरकारी योजना, शेती, शिक्षण आणि ब्रेकिंग न्यूजचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला आजच जॉईन करा.

हे पण वाचा..

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आरती आंबी यांचे संजय गायकवाड यांच्याविरोधात आरोप

“संतोष पंडितांना अटक, आमदार संजय गायकवाडांवर कारवाई का नाही?” आरती आंबींचा सवाल; 2-3 दिवसांत कोथरूड पोलीस ठाण्यात जाणार

साखरखेर्डा पोलीस ठाण्यात गणेशोत्सव शांतता समितीची बैठक

साखरखेर्ड्यात गणेशोत्सवापूर्वी मोठी बैठक; पोलिसांनी दिला ‘हा’ महत्त्वाचा इशारा

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघाताचे प्रतिनिधिक छायाचित

डोळ्यांसमोर उभे पीक, पण हातात काहीच नाही; शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरविला नांगर!

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघाताचे प्रतिनिधिक छायाचित

लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींची धडक; चार तरुण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

गणेशोत्सवातील डीजे बंदीवर सवाल उपस्थित करताना आमदार श्वेता महाले

गणेशोत्सवातच डीजे बंदी का? श्वेता महाले यांचा प्रशासनाला थेट सवाल; म्हणाल्या, ‘बंदी तर सरसकट घाला!’

ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान

२५ वर्षांच्या सामाजिक कार्याचा मोठा सन्मान; ॲड. वृषालीताई बोंद्रे यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ पुरस्कार

Leave a Comment