रिसोड तालुक्यातील किनखेडा ग्रामपंचायतच्या अंतर्गत ३७ लाख ७८,२८३ रुपयाचा भ्रष्टाचार झाला होता. याबाबत गावातील काही मंडळींनी सन 2022 मध्ये पालकमंत्री यांच्या आयोजित समाधान शिबिरात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे रिसोडच्या पंचायत समिती च्या माध्यमातून विस्तार अधिकाऱ्यांनी किनखेडा येथे जाऊन ग्रामपंचायतच्या दप्तराची चौकशी केली, त्यामध्ये विविधता आढळून आली.
त्यानुसार विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालामध्ये काही ठिकाणी पैसे खर्च झाले. काही ठिकाणी पैसे खर्च झाले नाही, परंतु खर्चानुसार कामे झाली नसल्याच्या गंभीर बाबीची नोंद त्या अहवालामध्ये नोंदवली व तसे नमूद केले. तर ग्रामपंचायतला प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषद मार्फत दि.६/८/२०१९ ला २,२४,४७४/- रु,दि.२६/३/२०२० ला शौचालयाच्या बांधकामासाठी ४,५०,०००/-रु., तर गटविकास अधिकारी यांच्या पंचायत समीती स्तरावरुन २,४६,०००/-रु., दि.९/७/२०२१ रोजी लेखा विभागाकडून २,२६,३९३/-रु., ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी ११,२७,४१६ रु.,आणी पंधराव्या वित्त आयोगाचे १,५०,०००/-रु.प्राप्त झाले.
असे एकुण ३७,७८,२८३ रु.चा भ्रष्ट्राचार झाल्याचे त्यावेळी अहवालात नमुद करण्यात आले होते आणी ग्रामपंचायतचे त्यावेळी चौकशी करण्यात आलेले रेकॉर्ड सुद्धा गहाळ आहे.ते कोठे आहे याचाही आजपर्यंत पत्ता नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. सदर खर्च अनधिकृत झाल्याचे त्या अहवालात म्हटले होते. व त्या अहवालावर तारीख ही नसल्याचे समजते परंतु तो अहवाल गेला कुठे गत अडीच वर्षापासून त्या बाबीची चौकशी नाही किंवा कोणाला माहितही नाही.
त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराची संबंधितांकडून वसुली करुन संपूर्ण रक्कम ३७, ७८,२८३/- ₹,ग्रामपंचायत खात्यात जमा करावी. अशी मागणी किनखेडा येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभाबाई विजयराव अवचार यांनी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम.मा.जिल्हाधिकारी वाशिम तथा,मा.गटविकास अधिकारी रिसोड यांना दिलेल्या १६आॅगष्ट २०२४ च्या तक्रारीत सौ.शोभाबाई अवचार यांनी मागणी केली आहे.