हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यात 15 एप्रिलला ऐतिहासिक करवंड महोत्सव; शिवकालीन वैभवाचा भव्य सोहळा

Follow Us:
करवंड महोत्सव 2026 बुलढाणा शिवाजी महाराज शोभायात्रा

बुलढाणा | प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील सर्वात भव्य सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक असलेला करवंड महोत्सव यंदा 15 एप्रिल रोजी रंगणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड येथे आयोजित या ऐतिहासिक महोत्सवात शिवकालीन परंपरा, संस्कृती आणि वैभवाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळणार आहे.

प्रा. दिलीप नाईकवाड यांच्या माहितीनुसार, बावन बुर्जी परिसरात होणारा हा महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या 370 व्या विवाह स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा आणि करवंड महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा केला जात आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री प्रताप जाधव असून उद्घाटन ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार आहे. तसेच रक्षाताई खडसे, मकरंद पाटील, संजय सावकारे, आकाश फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाची सुरुवात सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर सकाळी 8 ते 10 दरम्यान भव्य ऐतिहासिक शोभायात्रा काढण्यात येणार असून यात शिवराय आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या भूमिकेत कलाकार, लेझीम पथक, बँड, अश्वदल आणि मावळ्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरणार आहे.

सकाळी 10 ते 12 दरम्यान महोत्सवाचे उद्घाटन होईल. दुपारी पोवाडे, लोककला आणि शिवशाहीर प्रवीण फणसे यांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर प्रा. यशवंत गोसावी यांचे व्याख्यान आणि शाहीर विक्रांत राजपूत यांचे सादरीकरण होईल.

सायंकाळी विविध ऐतिहासिक व्याख्याने आयोजित करण्यात आली असून डॉ. नम्रता भोसले यांचे ‘मराठी कालीन स्त्री सामर्थ्य’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. रात्री 7 ते 10 दरम्यान 45 कलाकारांच्या सहभागातून भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

या कार्यक्रमात शिवरायांच्या जीवनातील प्रसंग, युद्धे, पोवाडे, गोंधळ, कोळीगीत अशा विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार असून प्रेक्षकांना एक वेगळाच ऐतिहासिक अनुभव मिळणार आहे. कार्यक्रमाचा समारोप रात्री 10 वाजता बावन बुर्जीवरील भव्य आतिषबाजीने होणार आहे.

करवंड महोत्सव समितीने महाराष्ट्रातील शिवप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. स्वागताध्यक्ष आमदार श्वेताताई महाले आणि समितीच्या वतीने हा सोहळा अविस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


👉 KattaNews.in वर अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्यासोबत राहा!

📲 WhatsApp ग्रुप जॉईन करा | 🔔 Notifications चालू ठेवा | 🌐 Website रोज भेट द्या


🔗 Related News

 

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment