हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चिखलीत भीषण अपघात : मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा जागीच मृत्यू

On: April 14, 2026 7:35 AM
Follow Us:
चिखली येथे मालवाहू वाहनाच्या धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू

चिखली प्रतिनिधी|१४ एप्रिल २०२६

चिखलीत भिषण अपघात, होमगार्ड जवान मृत्यू, बुलढाणा ब्रेकिंग न्यूज या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कर्तव्यावर असताना एका मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत होमगार्ड जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्दैवी अपघातामुळे चिखली तालुक्यात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड जवान आत्माराम उत्तमराव वखरे (वय ५७, रा. सवनाया) हे दुपारी सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार्यालयीन कर्तव्य बजावत होते. कामकाज पूर्ण करून ते बुलढाणा जिल्हा पोलीस कार्यालयात डाक देण्यासाठी दुचाकीने (एमएच २८ जेबी १४७१) जात होते. त्यांच्या सोबत किरण तुकाराम मोरे (वय ५०) हे देखील होते.

दरम्यान, केळवद येथील हॉटेल गुलमोहरसमोर त्यांच्या दुचाकीला बोलेरो पिकअप (एमएच २८ बीबी ७३६०) या मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की आत्माराम वखरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेले किरण मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक अमोल गायकवाड, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार भूषण गावंडे तसेच तालुका होमगार्ड समादेशक शिवसिंग साळोख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या प्रकरणी संबंधित वाहन चालकाविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

आत्माराम वखरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असा परिवार आहे. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच होमगार्ड दलात एक समर्पित आणि कर्तव्यदक्ष जवान गमावल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या घटनेमुळे संपूर्ण चिखली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे.


👉 Related News


📢 हे आवश्यक करा

अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी kattanews.in ला रोज भेट द्या. ही बातमी शेअर करून इतरांपर्यंत जरूर पोहोचवा.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जालना SRPF कॅम्पमध्ये गंभीर जखमी झालेला गुंज येथील जवान

जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला धडक; अपघातात चालकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

खामगावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

Leave a Comment