हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

समृद्धी महामार्गावर भीषण आग : बॅटऱ्यांनी भरलेला ट्रक काही क्षणांत जळून खाक, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

On: April 13, 2026 2:41 PM
Follow Us:
समृद्धी महामार्गावर दुसरबीडजवळ बॅटरी ट्रकला लागलेली भीषण आग

मेहकर (बुलढाणा) |१३ एप्रिल २०२६

समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बॅटऱ्यांनी भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने काही क्षणांतच संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. ही घटना रविवारी सकाळी दुसरबीडजवळ घडली असून चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली. या घटनेने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील चालक रोहित कुमार हा यूपी ६५ आरडी २१४० क्रमांकाच्या ट्रकमधून बनारस येथून इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या घेऊन नाशिकच्या दिशेने निघाला होता. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुसरबीड परिसरातील चॅनेल क्रमांक ३१२ जवळ ट्रकमधून अचानक धूर निघू लागला.

धूर दिसताच चालकाने तत्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीत भस्मसात झाला.

घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सहायक पोलिस निरीक्षक इंगळे यांच्यासह शेख नासिर, नाजीम चौधरी, श्रीकृष्ण ढुंगू, गायकवाड आणि इंदल राजपूत यांनी तत्काळ धाव घेतली. तसेच मेहकर नगरपालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, बॅटऱ्यांमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.


👉 संबंधित बातम्या


📢 तुमच्यासाठी महत्त्वाचे

अशाच ब्रेकिंग न्यूज, अपघात अपडेट्स आणि स्थानिक बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या कट्टा न्यूज  ला दररोज भेट द्या.

 

समाधान वानखेडे

२५ वर्षांच्या प्रदीर्घ पत्रकारितेच्या अनुभवासह समाधान वानखेडे ग्रामीण वास्तव, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी प्रकरणे आणि सामाजिक प्रश्नांवर अचूक, संतुलित व जबाबदार पत्रकारिता करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जालना SRPF कॅम्पमध्ये गंभीर जखमी झालेला गुंज येथील जवान

जालना SRPF कॅम्पमध्ये मध्यरात्री खळबळ; बुलढाणा जिल्ह्यातील गुंजच्या 25 वर्षीय जवानाने स्वतःवर झाडली गोळी

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला धडक; अपघातात चालकाचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर आयशरची कंटेनरला जोरदार धडक; ३३ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू

खामगावात चारित्र्याच्या संशयातून पत्नीला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

चारित्र्याच्या संशयाने संसार उद्ध्वस्त; ‘तुझे कोणासोबत लफडे आहे’ म्हणत पत्नीला बेदम मारहाण, अखेर मृत्यू

बकरीच्या पैशांवरून वादानंतर वडिलांचा मृत्यू

म्हातारपणी ज्या मुलाकडून आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाने बकरीच्या पैशांवरून घेतला वडिलांचा जीव

अंढेरा पोलिसांनी पकडलेले अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर

अंढेरा पोलिसांची मोठी कारवाई! रेतीची अवैध वाहतूक करणारे २ टिप्पर पकडले; ८ ब्रास रेतीसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

चिखली-खामगाव मार्गावर बस आणि टिप्परची जोरदार धडक

चिखली-खामगाव मार्गावर भीषण अपघात! बस-टिप्परची जोरदार धडक; टिप्परचा चुराडा

Leave a Comment