हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

Breaking News: ओव्हरलोड वाळू वाहतूक प्रकरणात RTO ची १० टिप्परवर धडक कारवाई; ₹7.86 लाखांचा दंड

On: April 13, 2026 9:47 AM
Follow Us:
ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर RTO कारवाई बुलढाणा

सिंदखेड राजा | १३ एप्रिल २०२६

ओव्हरलोड वाळू वाहतूक, अवैध वाळू माफिया कारवाई आणि RTO धडक कारवाई या मोठ्या घडामोडींमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. खापरखेडा लाड येथील वाळू घाटावर सुरू असलेल्या अवैध आणि ओव्हरलोड वाळू वाहतुकीवर प्रशासनाने कडक पावले उचलत १० टिप्परवर तब्बल ₹7.86 लाखांचा दंड ठोठावला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून वाळू माफियांना मोठा धक्का बसला आहे.

लोणार तहसील अंतर्गत खापरखेडा लाड परिसरात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची तक्रार ग्रामस्थांनी बिबी पोलिसांकडे केली होती. ८ एप्रिल रोजी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेत अवैध वाहतूक थांबवत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून काही टिप्पर ताब्यात घेतले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

तपासणीदरम्यान काही वाहनांकडे रॉयल्टी कागदपत्रे आढळली, मात्र वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरलेली असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बुलढाणा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. आरटीओ अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रॉनिक काट्यावर वाहनांचे वजन तपासले असता अनेक टिप्पर ओव्हरलोड असल्याचे उघड झाले.

एमएच-२८-बीबी-९९२२, एमएच-२८-बीएक्स-६७१७, एमएच-२८-बीबी-६०४०, एमएच-२८-बीबी-९९३२, एमएच-२८-बीबी-९९३१, एमएच-२८-बीबी-४१७५, एमएच-२८-सीएफ-८७४३, एमएच-२८-बीबी-९९२५, एमएच-२८-बीबी-९९४२ आणि एमएच-२८-बीबी-७२०२ या १० टिप्परवर ५ लाख ८६ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच इतर ३ वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये २ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. एकूण ₹7.86 लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक योगेश पाटील, सहाय्यक निरीक्षक निखिल ठाकूर, राजेश ढाकणे आणि वामन अडसर यांच्या पथकाने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीरसिंग दिलावर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

दरम्यान, स्थानिकांच्या मते या परिसरात दररोज शेकडो टिप्परद्वारे ओव्हरलोड वाळू वाहतूक सुरू असते, ज्यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत आहे. प्रशासनाने अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवून वाळू माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, स्थानिक पोलीस, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी अधिक सतर्क राहून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक पूर्णपणे थांबवावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

👉 अशीच ब्रेकिंग आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला फॉलो करा आणि ही बातमी शेअर करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

अंजनीखुर्द येथे भरधाव रेती टिप्परच्या भीषण धडकेत शेतकरी ठार

भरधाव रेती टिप्परची दुचाकीला भीषण धडक; उदनापूरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, अंजनीखुर्द हादरले

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात आयोजित शांतता समिती बैठकीत उपस्थित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात हाय अलर्ट; प्रशासन सज्ज, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू

साखरखेर्ड्यात पोलवर वीज दुरुस्ती करताना कंत्राटी कामगाराचा मृत्यू; २५ वर्षांत पाचवी दुर्घटना

चिखली येथे घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा केल्याचा आरोप; CCTV फुटेजनंतर गुन्हा दाखल

घरासमोर लिंबू टाकून जादूटोणा? CCTV मुळे उघड झाला धक्कादायक प्रकार; चिखलीत आरोपीवर गुन्हा

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे पेट्रोल पंपावरील इंधन साठ्याची तपासणी करताना

इंधन साठेबाजी आढळली तर थेट परवाना रद्द; जिल्हाधिकाऱ्यांचा पेट्रोल पंप चालकांना इशारा

रेती माफियांच्या हल्ल्यानंतर पत्रकार रामदास कहाळे प्रकरणावर साखरखेर्ड्यात निषेध

रेती माफियांचा पत्रकार रामदास कहाळे यांच्यावर जीवघेणा हल्ला; साखरखेर्ड्यात निषेध, आरोपींना अटक करण्याची मागणी

Leave a Comment