साखरखेर्डा |१२ एप्रिल २०२६
जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर अशक्य काहीच नाही — हे जया आणि पूजा चेके या दोन बहिणींनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सरकारी नोकरी मिळवून आपल्या आई-वडिलांचे नाव उज्वल केले आहे. एकीची महसूल सहाय्यक तर दुसरीची कालवा निरीक्षक पदी निवड झाली असून त्यांच्या यशाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या जया आणि पूजा यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द त्यांनी कायम ठेवली. त्यांच्या मेहनतीला पाठबळ देण्यासाठी पांगरी काटे येथील नातेवाईक अंबादास काटे व बेबीताई काटे यांनी त्यांना मुलींसारखे सांभाळले. साखरखेर्डा येथील स्पर्धा परीक्षा केंद्रात त्यांना शिक्षणासाठी पाठवले आणि सर्वतोपरी मदत केली.
या परिश्रमाचे फळ आज दोन्ही बहिणींना मिळाले. एका बहिणीची महसूल सहाय्यक पदावर तर दुसरीची कालवा निरीक्षक पदावर निवड झाली. त्यांच्या यशाने आई-वडील गणेश चेके व सरला चेके यांचा अभिमान द्विगुणित झाला आहे. समाजात त्यांच्या संघर्षाची आणि यशाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी आत्मविश्वास, मेहनत आणि जिद्द असेल तर यश नक्कीच मिळते — हा संदेश जया आणि पूजाने आपल्या यशातून समाजाला दिला आहे.
👉 ताज्या बातम्यांसाठी आम्हाला Follow करा.
Related News
- देऊळगावराजा हादरला! दगडवाडीत मध्यरात्री भीषण आग, गॅस सिलेंडर स्फोटात 7 जखमी; लाखोंचे नुकसान
- देऊळगाव राजात धक्कादायक घटना! वॉटरपार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; सुरक्षेवर गंभीर प्रश्न
- मलकापुरात ‘१ लाख द्या, ९ लाख घ्या’ घोटाळा उघड! नकली नोटा टोळीचा पर्दाफाश; पोलिसांवरच प्रश्नचिन्ह










