हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

देऊळगावराजा हादरला! दगडवाडीत मध्यरात्री भीषण आग, गॅस सिलेंडर स्फोटात 7 जखमी; लाखोंचे नुकसान

On: April 12, 2026 7:38 AM
Follow Us:
देऊळगावराजा दगडवाडी गॅस सिलेंडर स्फोट व भीषण आग – 7 जखमी

देऊळगाव राजा|१२ एप्रिल २०२६

देऊळगावराजा तालुक्यातील दगडवाडी येथे शुक्रवारी (10 एप्रिल) मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा जबरदस्त स्फोट झाल्याने परिसर हादरला. घटनेत 7 जण जखमी झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली, मात्र संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कारभारी दीपाजी नागरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. शेजारी राहणारे सौंदा उगलमुगले यांनी घरातून धूर व ज्वाळा पाहून तत्काळ शेजाऱ्यांना सतर्क केले आणि सरपंचांशी संपर्क साधला. सरपंच पतींनी तातडीने पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना माहिती देत अग्निशामक दलाला बोलावले.

गावकऱ्यांनी सुरुवातीला स्वतःच्या परीने पाण्याच्या बाटल्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वाढत असतानाच घरातील गॅस सिलेंडरचा प्रचंड स्फोट झाला. स्फोटाच्या तीव्रतेने घरावरील पत्रे व मोठे दगड दूरवर उडाले. स्फोटाचा आवाज संपूर्ण गावात घुमला आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या घटनेत आर्यन शंकर घुगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना 18 टाके घालावे लागले. इतर काही जण किरकोळ जखमी झाले. काहींना टिनपत्र व दगड लागल्याने दुखापत झाली.

घटनास्थळी 15–20 मिनिटांत अग्निशामक दल दाखल झाले. अग्निशामक कर्मचारी, पोलीस आणि गावकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. परिसरातील इतर घरांना आग लागण्याचा मोठा धोका होता, मात्र वेळीच उपाययोजना झाल्याने मोठा अनर्थ टळला.

या आगीत घरातील धान्य, महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य तसेच छतावरील सामान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

📢 ताज्या व विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.
ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सोमठाणा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणाची बातमी

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर मैदानात; ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

सोमठाण्यात तिहेरी हत्याकांड; आई, भाऊ आणि पुतण्याची हत्या

जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि तरुण पुतण्याची धारदार चाकूने हत्या; सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण चिखली तालुका हादरला

Leave a comment