नारायण आरु / प्रतिनिधी :-
शीरपूर ते बेलखेडा रस्त्यावरील वाळलेल्या व झुकलेल्या झाडाकडे दुर्लक्ष ! सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव यांच्या अंतर्गत येत असलेला शिरपूर ते बेलखेडा shirpur to belkheda रस्ता या रस्त्यावरील पंढरी देव्हडे यांच्या शेता जवळ दोन्ही साईडला एक-एक बाभळीचे वाळलेली झाडे असून त्यापैकी एक झाड सडून कोलमडून पडले. तर दुसरे बाभळीची हिरवेगार झाड रस्त्यावर झुकले ही दोन्ही मोठी झाडे आहेत व केव्हाही रस्त्यावर संततदार पावसामुळे जमीन दलदल झाल्याने कोलमडणार.
त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे प्रवासी यामध्ये गंभीर जखमी किंवा जीवित हानी शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालेगाव malegaon यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन अशा झाडाची ‘विल्हेवाट’ लावावी. असाच प्रकार २६ मे रोजी वाशिम-रिसोड राज्यमार्ग क्रमांक ५१, नायरा पेट्रोल पंपाजवळ वाळलेला आंबा वादळी हवेमुळे रिसोड risod येथील झुंगरे सर ची गाडी वाशिमहून washim रसत्याने येत असतांना त्याच्यां गाडीवर आंब्याची मोठी फांदी तुटून पडली. गाडीचे संपूर्ण नुकसान झाले. परंतु त्या गाडीत असलेल्या तीन व्यक्तीची जीवित हानी किंवा जखमी झाल्या नाहीत.