दिवाळी जाहिरात बुकिंग - KattaNews.in
📢 KattaNews.in जाहिरात सेवा
आपल्या व्यवसायाची जाहिरात आजच द्या!
लाखो लोकांपर्यंत पोहोचवा!
दुकाने • हॉस्पिटल • क्लासेस • हॉटेल • स्थानिक व्यवसाय
✅ जाहिरातीसाठी WhatsApp वर संपर्क करा
KattaNews.in
KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात सेवा
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

धक्कादायक आरोप! नाभिक समाजाला विधानभवनातही अपमान; आमदार सिद्धार्थ खरात यांनी उचलला आवाज

On: April 2, 2026 8:06 AM
Follow Us:
नाभिक समाजाच्या प्रश्नावर विधानसभेत बोलताना आमदार सिद्धार्थ खरात

मेहकर| २ एप्रिल २०२६

नाभिक समाजावर होत असलेल्या अपमानाच्या घटनांनी आता गंभीर वळण घेतले असून हा मुद्दा थेट विधानसभा पटलावर पोहोचला आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी नाभिक समाजाच्या व्यथेला आवाज देत शासनाचे लक्ष वेधले आहे. या मुद्द्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

साखरखेर्डा परिसरातील नाभिक समाजाच्या शिष्टमंडळाने आमदार सिद्धार्थ खरात यांची भेट घेऊन समाजाला होत असलेल्या अपमानाची गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. समाजाला हिणवणे, तुच्छ लेखणे तसेच सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी त्यांनी मांडल्या.

या मागण्यांची दखल घेत आमदार खरात यांनी विधानभवनात हा मुद्दा उपस्थित केला आणि शासनाचे लक्ष वेधले. यामुळे नाभिक समाजाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, नाभिक समाजाच्या नेत्यांनी देखील समाजाच्या एकजुटीवर भर देत समाजकारण व्यापक करण्याचे आवाहन केले. समाजाचा विकास आणि सन्मान राखण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

तसेच, विररत्न जिवाजी महाले आणि संत शिरोमणी राष्ट्रसंत सेना महाराज यांच्या जयंतीला शासन दरबारी मान्यता देऊन सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे नाभिक समाजाच्या प्रश्नांना राज्य पातळीवर महत्त्व मिळण्याची शक्यता असून पुढील काळात शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या आणि शेअर करा.

Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

लोणार उपोषण स्थगित, पोलीस ठाण्यासमोर चर्चा करताना शिवसेना (उबाठा) पदाधिकारी व पोलीस अधिकारी

लोणार उपोषण स्थगित: पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर अवैध दारू, गुटखा, मटक्याविरोधात १० दिवसांची मुदत

चिखलीतील तलाठी पियुष गायकवाड यांच्या आत्महत्येची बातमी

अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या

बुलढाणा जिल्हा परिषद लाचप्रकरण ACB कारवाई

बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ आणि अंढेरा परिसरातील धरणांवरील पाणी उपशाच्या तपासणीची मागणी

देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ, अंढेरा परिसरातील धरणांवर पाणी उपशाचे नियंत्रण कोण ठेवणार? भरारी पथकाच्या तपासणीची मागणी

शिंदी सरकारी एफ-क्लास जमीन प्रकरणात तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिंदी सरकारी जमीन प्रकरणात मोठी घडामोड! तत्कालीन ग्रामसेवकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

देऊळगाव राजा बालाजी महाराज मंदिरात मंगळसूत्र चोरीची घटना

देऊळगाव राजा येथील बालाजी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे मंगळसूत्र लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a comment