हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

वांग्याच्या शेतात अफूची शेती! अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत धक्कादायक प्रकार, ९.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

On: March 26, 2026 7:42 AM
Follow Us:
मेरा खुर्द येथे वांग्याच्या पिकात लपवलेली अफू पोलिसांनी जप्त करताना
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

अंढेरा |२६ मार्च २०२६

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत मेरा खुर्द येथे वांग्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वांग्याच्या शेतात अफूची शेती करून अवैध धंदा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी वांग्याच्या पिकात लपवलेली अफू जप्त करत तब्बल ९ लाख १८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा आणि अंढेरा पोलिसांनी संयुक्तरित्या ही धडक कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये यांच्या फिर्यादीवरून कृष्णा रामहरी वाघमारे (वय २६, रा. मेरा खुर्द) याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक (एनडीपीएस) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ मार्चच्या मध्यरात्री पोलिस गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी गट क्रमांक २०३ मधील शेतावर छापा टाकला. सुरुवातीला शेतात वांग्याचे पीक दिसत होते, मात्र बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये हिरवट रंगाची, बोंडे आलेली अफूची झाडे लपवून ठेवलेली असल्याचे उघड झाले.११.४७ किलो अफू जप्त
पंचांसमक्ष शेतातील झाडे उपटून जप्त करण्यात आली. एकूण ११.४७९ किलो वजनाच्या अफूच्या झाडांचा (मुळांसह, पाने व बोंडे) मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई २४ मार्च रात्री ११:३९ ते २५ मार्च पहाटे ४:४५ दरम्यान पार पडली.

या कारवाईदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी मनीषा कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा!

Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि WhatsApp ग्रुप जॉइन करा.


🔗 संबंधित बातम्या

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment