हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

On: March 18, 2026 9:41 AM
Follow Us:
मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

मोताळा (बुलढाणा) |१८ मार्च २०२६

येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी त्याने आपल्या हातावर लिहिलेला शेवटचा संदेश पाहून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

शिरपूर येथील रहिवासी सलमान खान अमीर खान पठाण हे मोताळा तालुक्यातील गोसिंग गावात विहिरीच्या कामावर क्रेन मशीन चालवत होते. गेल्या काही दिवसांपासून ते या ठिकाणी काम करत होते. मात्र, १६ मार्च रोजी सकाळी अचानक त्यांनी क्रेनलाच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

सलमान खान यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर “मेरी माँ और बच्चों का खयाल रखना” असा भावनिक संदेश लिहिला होता. हा संदेश पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान हे शारीरिक व्याधी असूनही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करत होते. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, या घटनेबाबत कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

👉 अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट देत राहा.

Related News

प्रवीण गरुडे

प्रवीण गरुडे हे Kattanews.in चे अनुभवी प्रतिनिधी असून ग्रामीण, सामाजिक, शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांचे अचूक व विश्वासार्ह वार्तांकन करतात. प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवर आधारित बातम्या सादर करणे ही त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न, ग्रामीण भागातील समस्या आणि सार्वजनिक हिताचे विषय प्रभावीपणे मांडण्यावर त्यांचा विशेष भर असतो. सत्यता, वेग आणि जबाबदारी या पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देत ते सातत्याने वाचकांपर्यंत बातम्या पोहोचवत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Mehkar Hotel Ekant police raid sex racket two women rescued

मेहकर बायपासवरील ‘हॉटेल एकांत’मध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात दोन महिलांची सुटका

सिंदखेडराजा तालुक्यातील वरोडी येथे महावितरणच्या वीज लाईनमुळे १ एकर गव्हाचे पीक जळून खाक

महावितरणच्या निष्काळजीपणाचा फटका! वरोडी येथे विधवा शेतकरी महिलेचा १ एकर गहू जळून खाक

मोहाडी शिवारात बिबट्याचा हल्ला, नीलगाई जखमी

मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार! नीलगाईवर हल्ला; मादी बिबट्या व दोन पिल्लांचा वावर

Lonar atrocity crime news elderly woman assault Udanapur Buldhana

लोणारमध्ये संतापजनक प्रकार! ६० वर्षीय मातंग महिलेवर मारहाण व विनयभंग; रमेशआण्णा मुळेवर अॅट्रॉसिटी गुन्हा

Leave a Comment