हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

लोणारमध्ये संतापजनक प्रकार! ६० वर्षीय मातंग महिलेवर मारहाण व विनयभंग; रमेशआण्णा मुळेवर अॅट्रॉसिटी गुन्हा

On: March 16, 2026 3:01 PM
Follow Us:
Lonar atrocity crime news elderly woman assault Udanapur Buldhana

लोणार (बुलढाणा) | १५ मार्च २०२६ 

किरकोळ वादाचे रूपांतर अमानवीय कृत्यात झाल्याची संतापजनक घटना लोणार तालुक्यातील उदनापूर येथे घडली आहे. एका ६० वर्षीय मातंग समाजाच्या वृद्ध महिलेला जमिनीच्या वादातून मध्यस्थी करण्यास नकार दिला म्हणून आरोपी रमेशआण्णा मुळे याने भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी पीडित महिला भिकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६० वर्षे) यांच्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी आरोपी रमेश अर्जुन मुळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार आरोपी रमेश अर्जुन मुळे आणि त्याचा पुतण्या संजय मुळे यांच्यात काही दिवसांपासून संपत्तीच्या वादावरून वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करून समझोता घडवून आणावा अशी आरोपीची इच्छा होती. मात्र दोन्ही पक्षांमध्ये समझोता न झाल्याने आरोपीने राग मनात धरल्याचे सांगितले जाते.

१२ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला भिकाबाई नेमाडे या गावातील पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. गिरणी बंद असल्याने त्या परतत असताना आरोपीने त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर मागून येत त्यांच्या कमरेत जोरात लाथ मारली. त्यामुळे त्या खाली पडल्या.

यानंतर आरोपीने खाली पडलेल्या वृद्ध महिलेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने जातीवाचक शिवीगाळ करत अत्यंत अश्लील व लज्जास्पद भाषेचा वापर करत महिलेचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या झटापटीदरम्यान महिलेच्या ब्लाउजची बाही फाटल्याचेही सांगण्यात आले आहे.

पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतरही आरोपीने तिला जिवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे उदनापूर परिसरात संताप व्यक्त होत असून सामाजिक संघटनांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, २९६, ११५(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(यु), ३(१)(डब्ल्यू)(आय), ३(१)(डब्ल्यू)(आयआय), ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मेहकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.


Related News


👉 अशाच ताज्या आणि विश्वासार्ह स्थानिक बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या.

 

विनायक कुटे

विनायक कुटे हे कट्टा न्यूज (Kattanews.in) चे प्रतिनिधी असून सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या विषयांवर सातत्याने वार्तांकन करतात. नियमभंग, नागरिकांच्या समस्या, सार्वजनिक हिताशी संबंधित प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकणे, ही त्यांच्या पत्रकारितेची ओळख आहे. सत्य, अचूक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

साखरखेर्डा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करताना भाजपचे मान्यवर

साखरखेर्ड्यात अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा उपक्रम

सिंदखेडराजा ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती ४३ गावांची यादी

सिंदखेडराजातील ४३ ग्रामपंचायतींवर पुन्हा प्रशासक! पाहा गावनिहाय नियुक्तीची संपूर्ण यादी

वाकोडी (मलकापूर) येथे भरदुपारी पोत हिसकावण्याचा प्रयत्न झालेले काजळे यांचे घर

भरदुपारी चाकूचा धाक दाखवून महिलेची पोत हिसकावण्याचा प्रयत्न; आरडाओरड होताच तरुण धावले अन् चोरट्याने पळ काढला!

Leave a Comment