बुलढाणा |१५ मार्च २०२६
(Epstein Files) एप्सटीन फाइल प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव आल्याचा दावा करत ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी नुकसानकारक ठरू शकतो, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. १४ मार्च रोजी सायंकाळी बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संघ कार्यालयावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, आपचे प्रतिनिधी तसेच डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठक झाल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
एप्सटीन फाइल (Epstein Files) हे केवळ सेक्स स्कॅण्डल नसून लहान मुलांवर आणि मुलींवर अत्याचार करून त्यांना मारून टाकण्यासारखा गंभीर प्रकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणात केंद्र सरकारमधील काही मंत्री तसेच नरेंद्र मोदी यांचेही नाव आल्याचा दावा त्यांनी केला.
काही देशांच्या अध्यक्षांशी संबंध सुरळीत ठेवण्यासाठी मोदी यांनी त्यांच्या समोर नाचले, असा आरोप करत आंबेडकर म्हणाले की त्यांच्या वागण्यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्का बसला आहे.
अमेरिकेबरोबर झालेल्या काही करारांमुळे भारताचे नुकसान होऊ शकते आणि देशाच्या सार्वभौमत्वावर परिणाम होऊ शकतो, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.
हे पण वाचा..
एसटीमध्ये मेगा भरती! १७,७४२ चालक-वाहक पदांसाठी मोठी संधी; परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा
समोरच्याकडे आपल्याविरोधात पुरावे असतील तर ब्लॅकमेल होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लॅकमेल होणारा पंतप्रधान देशासाठी धोकादायक ठरू शकतो, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
२३ मार्च रोजी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढून या मुद्द्यावर संघालाही जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात मध्यमवर्गीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हे पण वाचा..
या पत्रकार परिषदेला राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी धैर्यवर्धन पुंडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, देवा हिवराळे, समाधान डोंगरे, मनोज खरात आणि अॅड. अमर इंगळे उपस्थित होते.
📢 आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
ताज्या ब्रेकिंग न्यूज, सरकारी योजना, नोकरी अपडेट आणि स्थानिक बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.










