हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

जलजीवन योजनेतील निकृष्ट कामाचा आरोप; उत्राडा येथील पत्रकार 20 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर

On: March 8, 2026 9:03 AM
Follow Us:
जलजीवन योजना बुलढाणा उत्राडा गाव पाणी टाकी निकृष्ट काम आंदोलन

बुलढाणा |८ मार्च २०२६

जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील उत्राडा गावात जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गावात बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे व पाईपलाईनचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक पत्रकारांनी केला असून या कामाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी 20 मार्च 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत विशाल मधुकर गवई, फारुख युसूफ शेख आणि राजिक गफ्फार शेख या पत्रकारांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 5 फेब्रुवारी 2026 रोजी उत्राडा गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत निकृष्ट दर्जाची तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर 13 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग चिखली यांनी दिलेल्या पत्रात विहिरीचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे सांगण्यात आले. तसेच विहिरीपासून पाण्याच्या टाकीपर्यंत 90 मिमी व्यासाची एचडीपीई पाईपलाईन व 2115 मीटर लांबीचे काम करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

मात्र या उत्तरावर समाधान न झाल्याने आणि प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप करत पत्रकारांनी या संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत तसेच पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.

यासंदर्भात पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मार्च 2026 पासून आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषद बुलढाणा, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच पोलीस प्रशासनाला देखील पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे प्रशासन कसे लक्ष देते आणि चौकशीचे पाऊल उचलते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related News


Join Kattanews.in — आपल्या परिसरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment