KattaNews जाहिरात KattaNews जाहिरात
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

बस चालकाच्या मुलाची मोठी कामगिरी! पांगरी काटे येथील संकेत इंगळे ‘TA Army’ मध्ये निवड

On: March 5, 2026 5:04 PM
Follow Us:
पांगरी काटे येथील संकेत इंगळे यांची TA Army मध्ये निवड

बुलढाणा | ५ मार्च २०२६:

बुलढाणा जिल्ह्यातील पांगरी काटे येथील संकेत अशोक इंगळे यांची TA Army मध्ये निवड झाल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. अवघ्या 20 व्या वर्षी संकेत इंगळे यांनी टेरिटोरियल आर्मी (TA Army) मध्ये स्थान मिळवत आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे. मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले असून त्यांच्या यशाची सध्या परिसरात मोठी चर्चा सुरू आहे.

संकेत इंगळे हे पांगरी काटे येथील रहिवासी असून त्यांचे वडील अशोक काळुबा इंगळे हे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी बुलढाणा शहरातील एका खाजगी शाळेत बस चालक म्हणून काम करतात. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण मोठ्या कष्टाने सुरू ठेवले आहे. संकेत हा त्यांचा मोठा मुलगा असून लहानपणापासूनच तो अभ्यासाबरोबरच खेळांमध्येही अत्यंत मेहनती व जिद्दी होता.

संकेत इंगळे यांनी अनेक मैदानी खेळांमध्ये भाग घेतला असून विशेषतः धावण्याच्या स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक ठिकाणी अव्वल स्थान पटकावले आहे. लहानपणापासूनच देशसेवा करण्याची त्यांची इच्छा होती आणि सैनिक बनण्याचे स्वप्न त्यांनी मनात जपले होते.

सन 2025 मध्ये जाहीर झालेल्या TA Army भरती प्रक्रियेसाठी संकेत इंगळे यांनी प्रयत्न केले. कठोर परिश्रम, नियमित सराव आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले. अखेर 2 मार्च 2026 रोजी जाहीर झालेल्या निकालात संकेत अशोक इंगळे यांचे नाव निवड यादीत आले.

ही आनंदाची बातमी समजताच त्यांच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अवघ्या 20 व्या वर्षी मुलाने मिळवलेले हे यश कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

पांगरी काटे गावातील तरुणाची आर्मीमध्ये निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी संकेत इंगळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर तरुणांनाही देशसेवेची प्रेरणा मिळत आहे.


👉 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी

अशाच स्थानिक, सामाजिक, राजकीय आणि ब्रेकिंग बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.


Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या लाटामंडपोत्सवात २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी

देऊळगाव राजात ‘लक्ष्मी रमण गोविंदा’चा जयघोष! २१ महाकाय सागवानी लाटांची उभारणी; बालाजींच्या लाटामंडपोत्सवाला सुरुवात

मुख्याध्यापक अरुण शंकर झनके सर यांची तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड

आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या सेवाकार्याचा गौरव! मुख्याध्यापक अरुण झनके सर यांना तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्कार

शिक्षक आमदारांच्या १२ वर्षांच्या कामाचा हिशेब आणि साडी-पाकिटासाठी मते विकू नका असे संस्थाचालकांचे आवाहन

‘१२ वर्षांत शिक्षक आमदारांनी काय केले?’ संस्थाचालकांचा थेट सवाल; ‘साडी-पाकिटासाठी मते विकू नका’, शिक्षक मतदारांना स्पष्ट संदेश

उंबरखेड फाट्याजवळ कार अपघातात वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

चिखलीहून देऊळगाव राजाकडे येताना काळाचा घाला; उंबरखेड फाट्याजवळ अपघातात २४ वर्षीय वैष्णवी घुगे यांचा मृत्यू

अर्जुन इंगळे यांच्या ३४ वर्षांच्या नगरपालिका सेवाकाळाबाबत आणि बदली अहवालावरून उपस्थित झालेल्या प्रश्नांवरील बातमीचे थंबनेल.

३४ वर्षे एकाच नगरपालिकेत नोकरी, बदलीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल; नगरविकास विभागाच्या भूमिकेवर सवाल

श्री बालाजी महाराज यात्रा निमित्त देऊळगाव राजा नगरपरिषद हॉलमध्ये शांतता समितीची बैठक

‘श्री बालाजी महाराज यात्रेला गालबोट लागू देऊ नका’; डॉ. शशिकांत खेडेकर यांचे पोलीस उपअधीक्षक अमोल गायकवाड यांना निर्देश

Leave a comment