हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेरा बुद्रुकमध्ये DJ ला फाटा; टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीभावात शिवजयंती साजरी

On: February 20, 2026 4:35 PM
Follow Us:
मेरा बुद्रुक येथे टाळ मृदंगाच्या गजरात पारंपरिक शिवजयंती शोभायात्रा

मेरा बुद्रुक | २० फेब्रुवारी २०२६

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, पारंपरिक शिवजयंती उत्सव, DJ शिवाय साजरी शिवजयंती, वारकरी टाळ-मृदंग शोभायात्रा आणि सर्वधर्मीय सहभाग या वैशिष्ट्यांमुळे चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक येथे यंदाची शिवजयंती विशेष ठरली. ध्वनीप्रदूषणाला नकार देत गावकऱ्यांनी भक्तीभाव, संस्कृती आणि परंपरा जपत टाळ-मृदंगाच्या गजरात शिवभक्तीचा जल्लोष साजरा केला.

सकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक करून उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेसह महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. गावातून सजविलेल्या ट्रॅक्टरवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून पालखी सोहळ्याची शोभायात्रा काढण्यात आली.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शोभायात्रेची पुढील वाटचाल झाली. ह.भ.प. दत्ता महाराज गायनाचार्य, ह.भ.प. सतीश महाराज, ह.भ.प. राम महाराज मृदंगाचार्य तसेच जागदरी येथील वारकरी टाळकरी प्रशिक्षणार्थी मुलांनी टाळ-मृदंगाच्या तालावर शिवगर्जना करत वातावरण भक्तिमय केले.

शोभायात्रा अतीमशाहवली बाबांच्या दर्ग्यासमोर पोहोचताच मुस्लिम बांधवांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून हार अर्पण केला आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिला. गावातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत एकतेचे दर्शन घडवले.

शोभायात्रेदरम्यान गावातील ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विशेष म्हणजे महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. टाळकरी वारकऱ्यांच्या गजरामुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले.

समारोप प्रसंगी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन केले. उपस्थित वारकरी मंडळी, भजनी मंडळ, पोलीस कर्मचारी यांचा उत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आला. शोभायात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे व कर्मचारी उपस्थित होते.

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती पदाधिकारी, महिला, युवक व बालगोपाल यांच्या सहभागामुळे उत्सवाला लोकसहभागाचे रूप प्राप्त झाले. यंदा वेगळ्या पद्धतीने आदर्श शिवजयंती साजरी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले.

👉 Related News

Kattanews.in वाचत रहा — आपल्या परिसरातील विश्वासार्ह, सकारात्मक आणि समाजजोडणाऱ्या बातम्यांसाठी.

 

सुनिल अंभोरे

सुनिल अंभोरे हे आपल्या न्यूज नेटवर्कचे विश्वासार्ह आणि सक्रिय वार्ताहर असून ग्रामीण, सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताच्या विषयांवर सातत्याने लेखन करतात. स्थानिक पातळीवरील घडामोडी अचूक, निष्पक्ष आणि तथ्यांच्या आधारे वाचकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी प्रश्न, कायदा-सुव्यवस्था, प्रशासनाची कार्यपद्धती तसेच सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आवाज देणारी पत्रकारिता करण्यावर त्यांचा भर आहे. बातमी लेखनात पारदर्शकता, विश्वसनीय स्रोत आणि जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणे ही त्यांची ओळख आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Maharashtra News सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी तुकाराम मुंढे

खाद्यतेल विक्रीबाबत मोठा निर्णय! तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; सुटे तेल विकण्यास बंदी, नियम मोडल्यास कठोर कारवाई

साखरेचे भाव आजचे आणि साखरेचे आजचे बाजार भाव

साखरेचे भाव आजचे किती? साखरेचे बाजार भाव वाढले; साखरेचे भाव वाढण्याचे कारण काय?

हनवतखेडमध्ये बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत

बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत; हनवतखेडच्या शिवारात खळबळ, दुसरा अजगर असल्याने शेतकऱ्यांत भीती

मलकापूर पांग्रा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी

मलकापूर पांग्रा शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; मोहिनी मगर तालुक्यात द्वितीय

मेरा बुद्रुकचे शुभम डोंगरदिवे UPSC यशानंतर सनदी अधिकारी

मेरा बुद्रुकच्या सुपुत्राची UPSC मध्ये झेप; शुभम डोंगरदिवे यांची सनदी अधिकारी म्हणून गुजरातमध्ये नियुक्ती

चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

Leave a Comment