हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्ड्यात प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सवाची सांगता; भव्य रथोत्सव मिरवणुकीने भक्तिमय वातावरण

On: February 20, 2026 3:11 PM
Follow Us:
साखरखेर्डा येथे प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सव निमित्त भव्य रथोत्सव मिरवणूक

साखरखेर्डा |२० फेब्रुवारी २०२६

साखरखेर्डा येथे प.पू. श्री प्रल्हाद महाराज जन्मोत्सव, रथोत्सव मिरवणूक आणि धार्मिक उत्सव या प्रमुख आकर्षणांनी नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य रथोत्सव मिरवणुकीने जन्मोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली. सकाळी संस्थानातून सुरू झालेली मिरवणूक गुजरी चौक, श्रीराम मंदिर आणि श्रींच्या निवासस्थानापर्यंत जाऊन पुन्हा मंदिरात परतली.

मिरवणुकीदरम्यान महिलांनी सडामार्जन करून आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. ठिकठिकाणी भाविकांनी भक्तिभावाने पूजा करून दर्शन घेतले. शेकडो भजनी दिंड्यांनी सहभागी होत वातावरण भक्तिरसाने भारावले.ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल यांनी भाविकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था केली होती, तर संस्थानचे उपाध्यक्ष उल्हास देशपांडे यांनी पालखी सोहळ्यात खांदेकरी म्हणून सहभाग घेतला. श्रीरामाच्या जयघोषात महिलांनी पावली खेळत मिरवणुकीत उत्साह निर्माण केला.

१७ फेब्रुवारी रोजी रामदास पंत आचार्य यांनी श्रींच्या जीवनचरित्रावर प्रवचन सेवा दिली. त्यानंतर गुलाल उधळीत जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील हजारो भाविक या सोहळ्यास उपस्थित होते.

आठ दिवस चाललेल्या दासनवमी महोत्सवात प्रवचनकार पंकज किंबहुने, वसू भारद्वाज, रामदासपंत आचार्य आणि मुकुंदराव मुळे यांनी प्रवचन सेवा दिली. किर्तनकार संदीप बुवा मांडके, स.भ. व्यास अंबिकाताई लिंबेकर आणि प्रणव बुवा जोशी यांनी कीर्तन सादर केले. गायन सेवा भुषण महाजन, घननिळ पाटील, आत्माराम दुतोंडे, श्रीपाद निंबेकर, कृष्णेंद्र वाडीकर आणि नागेश अडगावकर यांनी सादर केली.

दासनवमी महोत्सवानिमित्त आयोजित आठ दिवसांच्या कार्यक्रमांनी साखरखेर्डा नगरीत आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.


👉 Related News

📢 Call To Action

👉 स्थानिक, धार्मिक आणि सामाजिक घडामोडींच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in नियमित वाचा.

👉 ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनलला आजच जॉइन करा.

 

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

देऊळगाव राजा श्री व्यंकटेश महाविद्यालयातील अभिजात मराठी भाषा सप्ताह कवी संमेलन

देऊळगाव राजात अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त कवी संमेलन; साहित्यिकांनी समाज जागृत ठेवावा – डॉ. शशिकांत पाटील

सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा परिसरात वाळत चाललेली कपाशीची झाडे

सिंदखेडराजा तालुक्यात २० हजार हेक्टरवरील कपाशी बाधित; कापूस येण्याआधीच पाती गळाली, शेतकरी संकटात

पिक कर्जासाठी स्टॅम्प पेपरच्या सक्तीबाबत बँकांना निर्देश

पिक कर्जासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर नको; संजय खडसेंचे बँकांना स्पष्ट निर्देश

सोमठाणा तिहेरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आत्मसमर्पणाची बातमी

सोमठाणा तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड; मुख्य आरोपी दीपक सुरडकर पनवेलमध्ये शरण, मुलालाही अटक

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात MPSC विद्यार्थ्यांचे निवेदन

MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी डॉ. ज्योतीताई खेडेकर मैदानात; ३५० ते ४०० विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाची कारवाई

चिखलीत अनधिकृत पाणी उपसा केल्यास पंप जप्त होणार; वीजपुरवठा खंडित करण्याचाही इशारा

Leave a comment