हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

शेगाव नगरपरिषदेत अर्थसंकल्प फेटाळला; नगराध्यक्ष अल्पमतात, राजकारण तापले

Follow Us:
शेगाव नगरपरिषद स्थायी समिती सभेत अर्थसंकल्पावर चर्चा
शेगाव | बुलढाणा |२० फेब्रुवारी २०२६शेगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सदस्यांनी ठाम विरोध करत फेटाळून लावल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अर्थसंकल्प जनहिताचा नसल्याचा आरोप करत सदस्यांनी प्रस्ताव नामंजूर केला असून नगराध्यक्ष अल्पमतात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे सत्ताधाऱ्यांना मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना न होता काही मोजक्या घटकांनाच होणार असल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहराच्या सर्वांगीण विकासाऐवजी दिशाभूल करणारा आणि जनहिताला मारक असा हा अर्थसंकल्प असल्याचे मत स्थायी समिती सदस्यांनी नोंदवले.

सभेदरम्यान वातावरण चांगलेच तापले होते. नगराध्यक्षांनी सदस्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र सदस्यांनी प्रतिसाद न देता प्रस्ताव ठामपणे नामंजूर केला. नगरपरिषद उपाध्यक्ष वैशाली सुळ यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांनी उघडपणे विरोध दर्शवल्याने नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सदस्यांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून नगराध्यक्ष सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा तसेच आर्थिक निर्णयांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे.

शेगाव नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीत अर्थसंकल्प नामंजूर झाल्याने प्रशासनात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुधारित अर्थसंकल्प सादर केला जाणार की राजकीय संघर्ष आणखी तीव्र होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या घडामोडी आगामी काळातील शेगावच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


🔎 हे पण वाचा..

वडिलांनंतर खंबीर आधार देणारा देवच हरपला – आमदार मनोज कायंदे

सिंदखेडराजा तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतीवर १० फेब्रुवारीपासून प्रशासक राज; मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश

प्रा. दिलीप नाईकवाड

प्रा. दिलीप नाईकवाड हे Katta News साठी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून बातम्या देतात. ते राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व वैचारिक विषयांवर वस्तुनिष्ठ व विश्लेषणात्मक लेखन करतात. ते मागील 15+ वर्षांपासून शिक्षण व वैचारिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

Maharashtra News सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी तुकाराम मुंढे

खाद्यतेल विक्रीबाबत मोठा निर्णय! तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये; सुटे तेल विकण्यास बंदी, नियम मोडल्यास कठोर कारवाई

साखरेचे भाव आजचे आणि साखरेचे आजचे बाजार भाव

साखरेचे भाव आजचे किती? साखरेचे बाजार भाव वाढले; साखरेचे भाव वाढण्याचे कारण काय?

हनवतखेडमध्ये बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत

बकरी गिळणारा महाकाय अजगर मृतावस्थेत; हनवतखेडच्या शिवारात खळबळ, दुसरा अजगर असल्याने शेतकऱ्यांत भीती

मलकापूर पांग्रा शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनी

मलकापूर पांग्रा शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत दमदार कामगिरी; मोहिनी मगर तालुक्यात द्वितीय

मेरा बुद्रुकचे शुभम डोंगरदिवे UPSC यशानंतर सनदी अधिकारी

मेरा बुद्रुकच्या सुपुत्राची UPSC मध्ये झेप; शुभम डोंगरदिवे यांची सनदी अधिकारी म्हणून गुजरातमध्ये नियुक्ती

चिखली दरेगाव मार्गावर मुक्कामी एसटी बस सुरू करण्याची मागणी

सायंकाळी बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल; चिखली–दरेगाव मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी

Leave a Comment