हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

नाथ समाजाच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी निवेदन; दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी

Follow Us:
हिंगणा वैजनाथ येथे नवनाथ महाराजांच्या मूर्तीची विटंबना प्रकरणी रिसोडमध्ये नाथ समाज व सकल हिंदू समाजाचे निवेदन

रिसोड | ६ फेब्रुवारी २०२६

नाथ संप्रदायाचे आराध्य दैवत तसेच हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कानिफनाथ आदी नवनाथ महाराज यांच्या मूर्तींची हिंगणा वैजनाथ (ता. शेगाव) येथे अज्ञात समाजकंटक व माथेफिरूने विटंबना करत तोडफोड केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नाथ समाजासह सकल हिंदू समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर दिनांक ४ रोजी रिसोड येथील नाथ समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री गुरु गोरक्षनाथ महाराज मंदिराचे संस्थापक अध्यक्ष व नगर परिषदेचे अध्यक्ष मा. भगवानरावजी सितारामजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

निवेदनात हिंगणा वैजनाथ येथील नवनाथ महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. धार्मिक श्रद्धा दुखावणाऱ्या अशा कृत्यांमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

यावेळी श्री गोरक्षनाथ मंदिराचे अध्यक्ष भगवानराव सिताराम क्षीरसागर, आदिनाथ इंगळे, ज्ञानेश्वर खंदारे, प्रकाश खंदारे, राजेंद्र खंदारे, भिकाजी येवले, रवींद्रनाथ खंदारे, अजय मगर, धर्मनाथ खंदारे, विकास झुंगरे, गजानन वाडेकर, प्रभाकर पाटील, गजानन इंगळे, मदन खंदारे, शिवाभाऊ पुरी, भीमसिंह राजपूत, किसन हिरण, राजू थोरात, शिवाजी जाधव, मयूर बगाडे, बबन येवले, गजानन लिंगे, निशांत इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

हे पण वाचा.

देर आये दुरुस्त आये! केनवड येथे आ. अमित झनक यांच्या निधीतून उभारलेले तलाठी भवन अखेर लोकांच्या सेवेत

महिलावर्गातून दिपाली ठाकरे, मनोरमा इंगळे, सुनीता खंदारे, वैशाली खंदारे, नेहा इंगळे, सविता इंगळे, विजया खंदारे, त्रिगुणा खंदारे, आशाबाई खंदारे, लक्ष्मीबाई येवले, ज्योती जाधव, प्रिया जाधव, अश्विनी जाधव, शुभांगी खंदारे, रेखा खंदारे, सीमा खंदारे, उमा इंगळे आदी महिला समाजसेविका उपस्थित होत्या.

हे पण वाचा..

कोयाळी (बु.) भिसडे येथे शेतातील तुरीच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे २.२५ लाखांचे नुकसान

दोषींवर तातडीने कारवाई न झाल्यास नाथ समाज व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


📢 वाचा | शेअर करा | धार्मिक एकतेसाठी आवाज उठा
अशाच ताज्या, विश्वासार्ह व प्रभावी ग्रामीण-राजकीय बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या.

 

नारायणराव आरु पाटील

नारायणराव आरू पाटील हे Katta News चे अधिकृत वाशिम जिल्हा प्रतिनिधी आहेत.ते मागील 10 वर्षांपासून स्थानिक व राज्य पत्रकारितेत कार्यरत असून वाशिम जिल्ह्यातील प्रशासन व सामाजिक विषयांवर वार्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकरमध्ये एका रात्रीत ज्वेलर्स आणि मेडिकल स्टोअरमध्ये धाडसी चोरी

मेहकर हादरले! ‘आज माझे दुकान… उद्या कोणाचे?’ एका रात्रीत ज्वेलर्ससह मेडिकल स्टोअर फोडले; व्यापाऱ्यांची उडाली झोप

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

Leave a Comment