हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

RSS शताब्दी वर्षानिमित्त सोमनाथ वस्तीमध्ये विशाल हिंदू संमेलनाला उस्फूर्त प्रतिसाद

On: February 1, 2026 12:58 PM
Follow Us:
सोमनाथ वस्ती चिखली येथे आयोजित विशाल हिंदू संमेलन
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

चिखली | १ फेब्रुवारी २०२६

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ठिकठिकाणी विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर गणेश नगर जुने गाव परिसरातील सोमनाथ वस्ती येथे रविवार दि. २५ जानेवारी रोजी विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.

 

सोमनाथ वस्ती येथे आयोजित विशाल हिंदू संमेलनास मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती

या संमेलनाला गणेश नगर व अंधारा महादेव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उस्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यकर्ते महेश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले.

यावेळी धर्मजागरण विभागाचे जिल्हा संयोजक सुहास जामदार यांनी प्रमुख मार्गदर्शन करत संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेची माहिती दिली.

ह. भ. प. अशोक महाराज पवळ यांनी “धर्मो रक्षती रक्षितः” या विषयावर प्रभावी प्रवचन केले, तर सौ. राजश्री देशपांडे यांनी नारीशक्ती या विषयावर आपले विचार मांडले.

तत्पूर्वी जुना बुलढाणा रोड येथील श्री सोमनाथ मंदिरापासून भव्य दिंडी शोभायात्रेला सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी, महिला भजनी मंडळ व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शोभायात्रेचे ठिकठिकाणी सडासंमार्जन, रांगोळ्या, केळीचे खांब व भगव्या पताकांनी स्वागत करण्यात आले. संमेलन स्थळी गोमाता पूजन व भारत माता पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात महेश महाजन यांनी हिंदुत्वाची जाणीव प्रत्येक धर्मबंधूमध्ये निर्माण झाल्यास सामाजिक ऐक्य अधिक बळकट होईल, असे मत व्यक्त केले.

संमेलनाच्या शेवटी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले असून तब्बल ५२५ बंधू-भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

या संमेलनास नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, भाजपा गटनेते अमोल कबुतरे व आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले, प्रास्ताविक सतीश शेटे यांनी तर आभार सुधीर शेटे यांनी मानले.

संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी सोमनाथ वस्ती परिसरातील स्वयंसेवक, सार्वजनिक गणेश मंडळ, जय अंबे नवरात्र उत्सव मंडळ, समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, नीलकमल गणेश मंडळ, आई तुळजाभवानी नवरात्र उत्सव मंडळ व जय बजरंग मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Related News

👉 अधिक अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या.

 

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment