UPSC news : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससीची) तयारी करीत असलेल्या अकोल्यातील एका युवतीने दिल्लीतील राजेंद्र नगरमध्ये rajendra nagar राहत असलेल्या फ्लॅटमध्ये २१ जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अकोल्यातील akola गंगानगर परिसरातील रहिवासी तसेच पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले एएसआय अनिल गोपनारायण anil gopnarayan यांची मुलगी अंजली हिने बीएससी कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी दिल्ली येथे यूपीएससीचे क्लासेस करण्यासाठी गेली होती. सुरुवातीला एक वर्ष करोल बाग परिसरात रहिवासी होती. त्यानंतर गत एक वर्षापासून ती राजेंद्र नगरमध्ये rajendra nagar राहत होती. यादरम्यान २५ वर्षीय अंजली गोपनारायण anjali gopnarayan हिने २१ जुलै रोजी राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यासंबंधी आत्महत्या करण्यापूर्वी मुलीने चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या प्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना मिळताच त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला व या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
विद्यार्थ्यांचे आंदोलन
दिल्लीत यूपीएससीची UPSC तयारी करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी रविचारी दिल्लीत विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चात अंजली गोपनारायण anjali gopnarayan या विद्यार्थिनीचे फोटो असलेले पोस्टर हाती घेत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.