हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

५० मोटारपंपांनी ‘काळ्यापाण्याचा तलाव’ सिंचन तलाव रिकामा! मलकापूर पांग्रात गुराढोरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न उभा

On: January 17, 2026 4:39 PM
Follow Us:
मलकापूर पांग्रा येथे ५० मोटारपंपांद्वारे काळ्यापाण्याच्या सिंचन तलावातून अवैध पाणी उपसा

सिंदखेड राजा | १७ जानेवारी २०२६

मलकापूर पांग्रा येथील ‘काळ्यापाण्याचा सिंचन तलाव’ सध्या अवैध पाणी उपशामुळे पूर्णपणे धोक्यात आला असून, तब्बल ५० हून अधिक मोटारपंप टाकून रात्रंदिवस पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाई वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ चिंतेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळा सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच या सिंचन तलावातील अर्ध्यापेक्षा अधिक पाणीसाठा अवैधरित्या उपसा करण्यात आला आहे. अशीच परिस्थिती पुढील काही दिवस राहिल्यास तलाव पूर्णपणे कोरडा पडण्याची भीती व्यक्त होत आहे. हा तलाव परिसरातील गुराढोरे तसेच शेतीतील विहिरींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

तलावात पाणी उपलब्ध असल्यास आजूबाजूच्या विहिरींच्या पाणीपातळीला आधार मिळतो. मात्र तलाव कोरडा पडल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधत शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते हानिप बागवान यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत.

तक्रारीनंतर ग्रामपंचायत अधिकारी उद्धव गायकवाड यांनी प्रत्यक्ष तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी तलावात टाकण्यात आलेल्या मोटारपंपांची नोंद घेण्यात आली असून संबंधित शेतकऱ्यांची नावे लिहून घेण्यात आली आहेत. ही माहिती पुढील कारवाईसाठी महसूल व सिंचन विभागाला देण्यात आली आहे.

दरम्यान, सिंचन विभागाने कडक भूमिका घेत दोन दिवसांत अवैध मोटारपंप काढून घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मुदतीत मोटारी न काढल्यास महसूल विभाग, ग्रामपंचायत व वीज वितरण कंपनीच्या संयुक्त कारवाईतून मोटारपंप जप्त करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अवैध मोटारपंप जप्तीचे आदेश
मलकापूर पांग्रा येथील सिंचन तलावातून अवैध पाणी उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर लघु पाटबंधारे सिंचन विभागाच्या अभियंता विशाखा सावंग यांनी उपविभागीय अभियंता देविदास केंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थळ पाहणी केली. शेतकऱ्यांना दोन दिवसांत मोटारपंप काढण्याचा इशारा देण्यात आला असून, अन्यथा संयुक्त कारवाईत मोटारपंप जप्त करण्यात येणार आहेत.

👉 तुमच्या परिसरातील पाणी प्रश्न, अवैध उपसा किंवा प्रशासनिक अन्यायाच्या बातम्या पाठवा!
📩 Email: editor@kattanews.in

Related News

 

समाधान सरकटे

समाधान सरकटे हे सिंदखेडराजा येथील प्रतिनिधी असून महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील सामाजिक, कृषी, प्रशासनिक व विकासात्मक घडामोडींचे राज्यस्तरावर वार्तांकन करतात. त्यांना ७ वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव असून शेतकरी प्रश्न, ग्रामपंचायत, ग्रामीण विकास योजना व स्थानिक प्रशासनाशी संबंधित बातम्यांवर त्यांचा विशेष भर आहे. ग्रामीण वास्तव अचूकपणे मांडणाऱ्या त्यांच्या बातम्यांना वाचकांचा मोठा विश्वास आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

Leave a Comment