amravati fraud doctor news : कला शाखेतून १२ पास आणि थेट डॉक्टर बघा सविस्तर बातमी

amravati fraud doctor news

amravati fraud doctor news : केवळ १२ वी पास तिही कला art शाखेतून उत्तीर्ण करणाऱ्या एका महिलेने घरातच अॅक्युपंक्चर व नॅचरोपॅथी acupuncture and naturopathy क्लिनिक उघडून डॉक्टरकीची प्रॅक्टिस चालविल्याचा धक्कादायक प्रकार येथील दहीसाथ भागात उघड झाला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या भाजीबाजार शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी फिरोजखान firojkhan यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी २३ जुलै रोजी आरोपी तोतया महिलेविरुद्ध वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३, ३४, ३६ व ३८ अन्वये गुन्हा दाखल केला.

 

 

 

 

ती महिला गेल्या चार वर्षांपासून तेथे डॉक्टरकी करण्याची कुठलीही डिग्री वा डिप्लोमा नसताना प्रॅक्टिस करत असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाहणीदरम्यान उघड झाले होते.मुंबईस्थित महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या प्रबंधकांनी  १० जून २०२४ रोजी महापालिकेला त्यांच्या क्षेत्रातील बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार एक महिला जिच्याकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय शैक्षणिक पात्रता अथवा डिप्लोमा वा डिग्री नसतानासुद्धा अॅक्युपंक्चर नॅचरोपॅथीद्वारे acupuncture and naturopathy जनसामान्यांवर डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.

 

 

 

 

त्यानुसार भाजीबाजार शहरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी फिरोजखान, डॉ. निगार खान nigar khan यांच्या पथकाने पोलिसांचे सहकार्य घेऊन ३ जुलै रोजी दुपारी एका ३० वर्षीय महिलेने दहीसाथ परिसरात थाटलेले क्लिनिक गाठले होते. तेथे पथकाला अरिहंत सुजोग ऍक्युपंक्चर नॅचरोपॅथी acupuncture and naturopathy  क्लिनिक असा बोर्डून आला. ताना गर्दन का वेदना, नसो का दुखणे, कमर का वेदना, गॅप, फ्रॅक्चर या ऑपरेशन के बादवाली व्हिडिओ, घुटनो का वेदना, थायरॉइड, मधुमेह, मोटापा, मानसिक असंतुलन, वांग, सायटिका, डीटॉक्स हे बिमारी वर इलाच आहे, असे बांधकाम सुलभातून आले.

 

 

 

 

बेसिक लेवल सर्टिफिकेट

■ पथकाने त्या क्लिनिकमध्ये प्रवेश केला असता तेथे अॅक्युपंक्चर नीडल्स, मॅग्नेट, गोल मॅग्नेट पेंचेस, बॉडी डेहॉक्स मशीन, सर्क्युलेशन मशीन, स्टीम लेटिंग मशीन या वस्तू मिळून आल्या.

■ तेथील स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या महिलेने त्यांच्याकडे इंटरनॅशनल सुजोग असोसिएशनचे सुजोग थेरपी इंडक्शन बेसिक लेवलचा कोर्स केलेले सर्टिफिकेट दाखवले. त्याची पथकाने तपासणी केली असता सत्य बाहेर आले.

 

 

 

व्हिजिटिंग कार्ड, फलकावरही डॉक्टर

त्या महिलेकडे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता असलेले कोणतेही प्रमाणपत्र नसतानासुद्धा व्हिजिटिंग कार्डवर व दवाखान्याच्या बोर्डवर त्यांनी स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लिहिले असून त्याखाली डायनस सुजोक अॅक्युपंक्चर नॅचरोपॅथी, थेरपी असे लिहिलेले दिसून आले. त्या महिलेकडे कुठलीही डॉक्टर पदविका नसताना त्या प्रैक्टिस करत असल्याने निरीक्षण नोंदवत ते महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे, असे ‘डॉ. फिरोजखान’ यांनी तक्रारीत नमूद केले आहे.