साखरखेर्डा येथील बीएसएनएल कार्यालय कर्मचाऱ्याअभावी झाडा-झुडपांनी वेढले ; आणि येथे बीएसएनएल ची सेवा सुरु होणार ?

साखरखेर्डा

साखरखेर्डा येथे ‘बीएसएनएलची’ सुविधा मिळावी म्हणून ग्राम पंचायतीने ई क्लास जमीन दान दिली. त्या जमीनीवर भव्य इमारत उभी राहिली, परंतू कर्मचारी आणि ग्राहकांना योग्य सुविधा न मिळाल्याने आज सात्यातील अद्ययावत यंत्रणा पुन्हा कात टाकून सुरु होईल काय याची प्रतिक्षा नागरिकांना लागली आहे. केंद्र सरकारने बी एस एन एल ची BSNL सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 

 

 

 

ग्रामीण भागात त्याचे नेटवर्कर पसरविण्याउभारण्यास परवानगी दिली आहे बुलढाणा buldhana जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव Prataprao jadhav यांनी टावर उभे करण्याची घोषणा केली. आज मोबाईल कंपन्यांचे जाळे एवढे वाढले आहे की, प्रत्येकसाठी टावर साखरखेर्डा sakharkherda येथील बीएसएनएल BSNL कार्यालय शेवटची घटका मोजत आहे की काय ! अशी अवस्था झाली आहे. झाडाझुडुपांमध्ये वेढले गेलेले कार्यालय आणि कंपनीने योजनांचा महापूर आणूनग्राहकांनी बी एस एन एल वरच विर्भास होता.

 

 

 

 

परंतू परिस्थिती बदलली आणि सेवा सुरळीत न मिळाल्याने साखरखेर्डा, मोहाडी, सवडद, शेंदुर्जन, शिंदी, गोरेगाव, यासह अनेक गावातील फोन बंद झाले. कार्यालयात वॉचमन नाही, ऑपरेटर नाही. तक्रार घ्यायला कोणीही उपलब्ध नसल्याने आठ वर्षांपासून साखरखेर्डा sakharkherda  येथील सेवा कोलमडून पडली आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा बीएसएनएलची BSNL सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलले आहे. ही बाब स्वागतार्ह आहे अशा प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहेत. ग्राहकांच्या खिशातून पैसे कसे काढता येईल यासाठी मोबाईलवर अनेक सुविधा करुन ठेवलेल्या आहेत. त्या माध्यमातून छुप्या पद्धतीने आपला पैसा काढल्या जात आहे. खाजगी मोबाईल कंपन्यांचे जाळे पसरण्यापुर्वी केंद्र सरकारच्या मालकीची भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड ही कंपनी कार्यरत होती.

 

 

 

 

प्रचंड नफा कमविणारी कंपनी असताना खाजगी कंपन्याचा शिरकाव यात्त झाला. कालांतराने शासनाने बीएसएनएलकडे असलेले लक्ष दुर्लक्षीत केले अनेक ठिकाणी असलेले कर्मचारी कमी करून यांनी केले अनेक मोठमोठी कार्यालय ओस पडली. साखरखेर्डा येथे बी एस एन एल BSNL ची टोलेजंग इमारत उभी राहावी यासाठी तत्कालीन सरपंच रविंद्र पाटील RAVINDRA PATIL यांनी ई क्लास जमीन दान दिली होती. मोठी इमारत उभी राहिली. साखरखेर्डा गावातील व्यापारी, उद्योजक, कर्मचारी, मध्यमवर्गीय यांच्या घरात फोनची बेल खनखनू लागली. २००८ साली ग्रामीण भागात सर्वप्रथम बी एस एन एल BSNL चे सिमकार्ड आले. एका कार्डसाठी ग्राहकांनी ७०० ते ८०० रुपये खर्च करून कार्ड मिळविले. त्यासाठी एक एक महिना वेटींग वर राहावे लागले. तरीही