washim : रिठद येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची भेट

washim

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील

 

washim : रिसोड risod तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी बबन श्रीराम जाधव यांनी दिनांक १९सष्टे.रोजी आत्महत्या केली होती.यांची पत्नी कमल जाधव,व दोन मुले आणी भाऊ पांडुरंग जाधव, गजानन जाधव यांना सांत्वनपर भेट देण्यासाठी रिसोडच्या risod तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर pratiksha tejankar यांनी रिठद येथे दि.२५सष्टे.रोजी भेट घेऊन कुटुंबाचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या का केली ? या संदर्भात चर्चाही केली.

 

 

 

त्याची माहिती पत्नी कमल जाधव ने सांगितले यावर्षी अतिवृष्टी मुळे सोयाबीन पिकाला शेंगा न लागल्याने बँकेचे कर्ज व इतर कारणासाठी घेतलेले कर्ज या चिंतेत वावरत होते.तहसिलदार यांनी याबाबत ग्रामस्तरीय समितीने अशा बाबी घडत असतील तर त्याबाबत मार्गदर्शन करणे गरजेचे आहे ग्रामस्तरीय समिती यांनी ग्रामसभा घेऊन समुपदेशन सुद्धा सभेच्या माध्यमातून करायला हवे. जर ‘आत्महत्या’ करण्यास आपण परावृत्त केले तर त्याचाही पुण्य लाभते.

 

 

 

यासाठी आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याचा आमच्या महसूल विभागाकडून प्रयत्न करू, जवळपास एक लाख रुपयाची मदत देऊ तर पत्नी कमल जाधव यांना संजय गांधी योजनेअंतर्गत अर्थसहाय्य करण्यासाठी प्रयत्न करा असे तलाठी संत्रे यांना सांगितले आणि या मुलांसाठी महिला बाल विकास संगोपन अंतर्गत शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल ,त्यासाठी सुद्धा संपूर्ण मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे यावेळी मंडळ अधिकारी पडवे ,तलाठी रूपाली संत्रे, कोतवाल रवी आरु, सामाजिक कार्यकर्ते नारायण आरु, धनंजय बोरकर, दिनकर बोरकर, विश्वनाथ आरू, भानुदास जाधव राजू जाधव, सुनील बोरकर व इत्यादी मंडळी उपस्थित होती.