नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
रिसोड येथील जिजामाता नागरी व ग्रामीण सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 25 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब देशमुख होते. सुरुवातीला राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे सर्वच मान्यवरांनी पूजन करून अध्यक्ष व सर्व मान्यवरांचे पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.
पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देशमुख बोलतांना असे सांगितले की दरवर्षी पतसंस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. जसे की वृक्षारोपण, गरजवंत विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके वाटप करण्यात येतात. रिसोड आणि मोठेगाव पतसंस्थेचा कारभार सुरळीत चालू असून पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. या संस्थेत ग्राहकाचे हित व संस्थेचाही फायदा दोन्ही विषय जोपासल्या जातात.
यावेळी संचालक व प्रमुख पाहुणे म्हणून गजाननराव जिरवणकर, गजाननराव लाटे ,गणेश देशमुख ,मनीषा सानप, संगीता देशमुख ,महावीर गुगें, विनायक जोगदंड, मनोहर वाघमारे, सुरेश काळे, भगवानराव वाघमारे, घनश्याम मापारी, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामप्रसाद देशमुख यांनी केले तर संस्थेचे कर्मचारी भगवानराव तायडे भागवत काकडे, अनिल जाधव विकास सदार, भागवत पौळ, विकास सदार,सचीन सराफ,सागर बेलोकार यासह सर्व संचालक, कर्मचारी यांनी वार्षीक सर्व साधारण सभा उत्साहात पार पडली.