वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम (washim) जिल्ह्यातील पोहरादेवी (pohradevi)ता .मानोरा येथे दौऱ्यानिमीत्त नंगारा म्युझीयमचे लोकार्पण सोहळा साजरा करण्याचे निमीत्ताने आयोजीत ५ आक्टो.२०२४ या बंदोबस्तासाठी कार्यरत पोलीस व महीला पोलीस कर्मचारी यांनी राजकीय नेत्यांच्या व जनतेच्या हितासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले.
परंतू त्यांच्या साठी या पोहरागड क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नसल्याने उष्णतेमुळे या कर्मचाऱ्यांच्या शरिराची लाही-लाही होत असल्याने तृष्णा भागत नसल्यामुळे आसपास कोणतीही तृष्णा भागवण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने आणी पोहरागड तालुका मानोरा येथे बंदोबस्तासाठी जेथे ड्युटी लागली तो परिसर सोडून इतरत्र जाताही येत नसल्याने जवळूनच एका जलवाहिनीच्या पिण्याच्या पाण्याची जलवाहीनी जात असलेल्या पाईपलाईनवर सिमेंट मध्ये उभा केलेला व्हाॅल्व होता, त्या मधून पाणी येत होते त्या गळती होत असलेल्या व्हाॅल्व मधून पोलीस कर्मचाऱ्याची पिण्याच्या पाण्याची तहान भागवली परंतु येवढ्या मोठ्या कार्यक्रमात पोलिस कर्मचाऱ्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली नाही.याबाबत जनतेने व उपस्थित लोकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.अशी कार्यक्रमानंतर जनतेत चर्चा होती.